शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्ह्याची बैठक अकलूज येथे संपन्न होणार…
अकलूज (बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अकलूज, ता. माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवार दि. 07/02/2025 रोजी दुपारी 3.00 वाजता संपन्न होणार आहे. तरी जिल्ह्यातील व तालुक्यातील स्वाभिमानीच्या सर्व शिलेदारांनी उपस्थित राहावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका माजी अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी आवाहन केलेले आहे.
शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या अकलूज येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीकडे स्वाभिमानीच्या शिलेदारांचे लक्ष लागलेले आहे. कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर पहिल्यांदाच राजू शेट्टी साहेब बैठकीसाठी उपस्थित राहत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तसेच नगरपंचायत व नगरपालिका निवडणुका संदर्भात आढावा बैठक होऊन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर होण्याची शक्यता आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.