ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दणका, उच्च न्यायालयाने ठोठावला १५ हजारांचा दंड…

आदेशाचे पालन न करता मनमानी केल्याचा ठपका

सोलापूर (बारामती झटका)

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे योग्य पालन न करता मनमानी पद्धतीने कारभार केल्यामुळे शिक्षणाधिकारी कादर शेख आणि संस्था अध्यक्ष श्री सोमलिंग शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांना मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला, शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दि. १९ जुलै रोजी प्रक्रिया योग्य प्रकारे न राबवता दिलेले आदेश रद्द केले.

यातील फिर्यादी युनूस मुबारक शेख यांची श्री सोमलिंग शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ संचलित श्री महासिद्ध प्राथमिक शाळा भंडार कवठे येथे सन २०१२ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

नातेवाईकाला अनुदानित पदावर नियुक्तीचा प्रयत्न
सन २०२० मध्ये संस्था अध्यक्षांनी आपल्या भावाच्या सूनेला अनुदानित पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी युनूस मुबारक शेख यांना विनाअनुदानित पदावर बदली करीत होते. त्याला फिर्यादी यांनी अॅड. अशोक ताजणे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात येथे रिट याचिका दाखल करून न्यायाची मागणी केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश नितीन जामदार आणि एम. एम. साठे यांच्या पीठाने शाळा व संस्थेची सर्व कागदपत्रे आणि रेकॉर्ड तपासणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा, असे दि. १२ जून २०२४ रोजी आदेश दिले, परंतु शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी उच्च न्यायालयाचे आदेश डावलून कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता एकतर्फी निर्णय दिला. हि बाब अॅड. नरेंद्र बांदिवडेकर आणि अॅड. अशोक ताजणे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या बाजूने अॅड. अशोक ताजणे, अॅड. नरेंद्र बांदी वाडेकर, अॅड. योगेश थोरात यांनी काम पाहिले.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान
या प्रकारामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे. त्यामुळे आपल्या विरुद्ध अवमानाची कारवाई का करु नये, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केल्यानंतर शिक्षणाधिकारी आणि संस्था मुंबई आणि इन डिफेन्स ऑफ एनिमल्स अध्यक्षांच्या वकिलांनी न्यायाधीशांची माफी मागून अवमानाची कारवाई करू नये, अशी विनंती केली. त्यावर न्यायाधीशांनी दया दाखवत शिक्षणाधिकारी कादर शेख आणि संस्थाचालक यांनी प्रत्येकी १५ हजार रुपये दंड चिल्ड्रन एड सोसायटी मुंबई आणि इन डिफेन्स ऑफ एनिमल्स या संस्थेस अदा करण्याचे आदेश दिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button