ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

शिवामृत दूध संघाच्या गुंतवणुकीची होणार चौकशी

अकलूज (बारामती झटका) (ॲग्रोवन साभार)

सहकारी संस्था कलम ८३ अन्वये अकलूजच्या शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाची सखोल चौकशी करण्याचे आदेश विभागीय दुग्ध निबंधक डॉ. महेश कदम यांनी दिले आहेत. मुख्यतः विजय मल्टिस्टेटमधील गुंतवणुकीबाबत ही चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येते.

शिवामृत दूध संघावर मोहिते पाटील गटाचे वर्चस्व आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या संघाचे अध्यक्ष आहेत. शिवामृत दूध संघाने विजय मल्टिस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक आणि मल्टिस्टेटकडून संघाला मिळालेला परतावा, या मुद्द्यावर ही चौकशी होईल. शिवामृत संघाच्या २०१८-१९ च्या लेखा परीक्षण अहवालात संघाची गुंतवणूक ७ कोटी ८२ लाख रुपये दाखवली आहे. त्यापैकी एक कोटी ७८ लाख रुपये ताळेबंदाप्रमाणे दिसत आहेत. मात्र उर्वरित सहा कोटींचा ४ लाखांचा तपशील उपलब्ध नाही.

संघाने विजय मल्टिस्टेटमध्ये ४ कोटी ७४ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय आयसीआय बँकेकडून दहा कोटी रुपयांचे कर्ज सहा टक्के दराने घेतले आहे. पण त्यापैकी सहा कोटी रुपये विजय ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत नऊ टक्के व्याजदराने ठेव म्हणून ठेवले आहेत. या सगळ्यांची चौकशी होणार आहे.

दोन महिन्यांत चौकशी
सहायक निबंधक आबासाहेब गावडे यांची या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये ते चौकशीच्या अनुषंगाने आपला अहवाल विभागीय दुग्ध निबंधकांकडे देतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (ॲग्रोवन आभार)

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom