शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना लि. युनिट ४ संचलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न होणार

ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते तर आ. अभिजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार
सांगोला (बारामती झटका)
धाराशिव साखर कारखाना लिमिटेड युनिट ४ संचलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना वाकी-शिवणे, ता. सांगोला या कारखान्याचा सन २०२५-२६ चा ११ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ श्री संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहुचे अध्यक्ष ह. भ. प. श्री. बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते तर माढा विधानसभा मतदार संघाचे सदस्य तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर चे चेअरमन आमदार अभिजीत धनंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.१५ वा. धाराशिव साखर कारखाना लिमिटेड युनिट ४ संचलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना वाकी-शिवणे, ता. सांगोला येथे संपन्न होणार आहे.

यावेळी श्री. महादेव उत्तम देठे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शितल महादेव देठे, श्री. राहुल कांतीलाल हातगिणे व त्यांच्या सुविद्य पत्नी दिपाली राहुल हातगिणे या उभयतांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर होमहवन पूजा संपन्न होणार आहे.
तर सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक, संचालक मंडळ, खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



