राजकारणातील विठ्ठल देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमागे मोहिते पाटील कान धरून बसले, तर नाईक निंबाळकर कान देऊन ऐकत बसले..

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत ताठ मानेने माजी आमदार राम सातपुते चालत होते…
पंढरपूर (बारामती झटका)
अखंड विश्वाचा व सांप्रदायिक भोळ्याभाबड्या भाविकांचा पांडुरंगाची आषाढीवारी निमित्त शासकीय महापूजेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पंढरपूर येथे आलेले होते. राजकारणात हुशार, चतुरबुद्धी व राजकीय कौशल्य वापरून सर्वसामान्य जनता प्रशासन व राजकीय नेते व कार्यकर्ते यांचा त्रिवेणी संगम साधून राजकारण करीत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या नेते व कार्यकर्त्यांचे राजकीय पांडुरंग आहेत. राजकारणात पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना न बोलता जाणीव होईल, अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये वागणूक दिली जाते. याचाच प्रत्यय पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये राजकारणातील विठ्ठल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमागे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील कान धरून बसलेले आहेत, तर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अमृता फडणवीस कार्यक्रमांमध्ये कान देऊन ऐकत बसलेले आहेत. दोन रणजीतसिंह यांच्यातील पक्षनिष्ठेने त्यांची जागा त्यांच्या ठिकाणी दाखवून दिलेली असल्याने राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरू आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या समवेत ताठ मानेने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते चालत होते.

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत रणजीतसिंह नाईक निंबाळकर व विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊन सुद्धा पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे भारतीय जनता पक्षात तालुका स्तरापासून राज्यस्तरापर्यंत चर्चा सुरू आहे. मोहिते पाटील यांनी पक्षाशी गद्दारी केली, असा ठपका ठेवण्यात आलेला आहे.
अनेकांनी भाजपमधून हाकलपट्टी करण्याची मागणी केलेली होती परंतु, केंद्रीय वरिष्ठ नेतृत्व व महाराष्ट्रातील नेतृत्वाने ठरवलेले आहे हकालपट्टीपेक्षा नाचक्की करून गद्दारांची जागा दाखवून द्यायची आहे.

आषाढी वारीच्या महापूजेसाठी महाराष्ट्रातून नाहीतर देश विदेशातून भाविकभक्त येत असतात. अनेक वृत्तवाहिन्या थेट प्रक्षेपण करीत असतात. राजकारणातील विठ्ठल देवेंद्रजी फडणवीस यांनी निष्ठावानाला न्याय देऊन गद्दारांना जागा दाखवून दिलेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



