शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर यशराज अग्रो इंडस्ट्रीजचे कस्तुराई फीड्स पशुखाद्य निर्मिती कंपनीचा उद्घाटन समारंभ…

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, मा. आ. बबनदादा शिंदे, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ना. दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तर मा. आ. संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार…
टेंभूर्णी (बारामती झटका)
टेंभुर्णी ता. माढा, येथे यशराज ॲग्रो इंडस्ट्रीजचे कस्तुराई फिड्स या पशुखाद्य निर्मिती कंपनीचा उद्घाटन समारंभ शिवजयंतीच्या मुहूर्तावर दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामविकास व पंचायत राजमंत्री महाराष्ट्र राज्य तथा सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जया भाऊ, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभेचे माजी आमदार बबनरावजी शिंदे, क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते दु. ३.३० वा. प्लॉट नं. बी B-2/3 एमआयडीसी टेंभुर्णी, ता. माढा येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. संजय (मामा) शिंदे माजी आमदार, करमाळा, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजनजी पाटील अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद, अभिजित (आबा) पाटील आमदार माढा विधानसभा हे असणार आहेत. तर विशेष उपस्थितीत प्रा. शिवाजीराव सावंत सर चेअरमन, भैरवनाथ शुगर्स, आलेगाव, श्री. यशवंत (तात्या) माने मा. आमदार, मोहोळ, श्री. आप्पासाहेब जगदाळे संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, श्री. रणजितसिंह (भैय्या) शिंदे चेअरमन, जिल्हा दूध संघ, सोलापूर हे असणार आहेत. सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. श्री. शैलेश मदने इंटरनॅशनल सेल्स मॅनेजर, Advanced Enzyames दुग्ध व्यवसाय तज्ञ, शिवव्याख्याते / कीर्तनकार ह. भ. प. सुसेन महाराज नाईकवाडे शिवचरित्रकार, पुणे हे असणार आहेत.

तर यावेळी प्रमुख उपस्थितीत श्री. भारत (आबा) शिंदे जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर, श्री. शिवाजी (नाना) कांबळे मा. सभापती, स. कल्याण, जि.प. सोलापूर, श्री. संजय (बाबा) कोकाटे नेते, रा.कॉ. पक्ष – शरदचंद्र पवार, श्री. दादासाहेब साठे चेअरमन, कुर्मदास शुगर्स, पडसाळी, श्री. वामन (भाऊ) उबाळे व्हा. चेअरमन, विठ्ठलराव शिंद सह. सा. कारखाना, मा. श्री. संजय (दादा) पाटील मा. सभापती, कृ. व पशूसंवर्धन, जि.प. सोलापूर, मा. श्री. शिवाजी पाटील, चांदजकर जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर, मा. श्री. बंडू (नाना) ढवळे चेअरमन, खरेदी विक्री संघ, कुर्डूवाडी, मा. श्री. नागनाथ (भाऊ) खटके-पाटील अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, तांबवे, मा. श्री. भारत (नाना) पाटील मा. चेअरमन, लेबर फेडरेशन सोलापूर, मा. श्री. धनराज (दादा) शिंदे अध्यक्ष, माढा वेल्फेयर फाऊंडेशन, मा. श्री. सुनिल (बप्पा) मोरे संस्थापक, शंभुराजे युवा क्रांती, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. विठ्ठल (भाऊ) ढवळे उद्योजक, पुणे (समर्थ एंटरप्रायजेस), मा. श्री. योगेश (बाबाराजे) बोबडे अध्यक्ष, भाजपा माढा तालुका, मा. श्री. रावसाहेब (नाना) देशमुख मा. अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर, मा. श्री. दीपक पाटील साहेब पोलीस निरीक्षक, टेंभुर्णी, मा. श्री. एस. जी. भवड साहेब निरीक्षक, उत्पादक शुल्क अकलूज, मा. श्री. बाळासाहेब (तात्या) ढवळे मा. संचालक, विठ्ठलराव शिंदे सह.सा. कारखाना, मा. श्री. उत्तम गावडे साहेब शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, टेंभुर्णी, मा. सौ. सुरजाताई बोबडे सरपंच, ग्रामपंचायत टेंभुर्णी, मा. श्री. दिलीपराव भोसले संचालक, कृ. उ. बा. स. कुर्डूवाडी, मा. श्री. औदुंबर (भाऊ) महाडीक देशमुख व्हा. चेअरमन, DVP मल्टीस्टेट, मा. श्री. सूरज (भैय्या) देशमुख युवक अध्यक्ष, सोलापूर जिल्हा रा.कॉ. श.प., मा. श्री. मधुकर (आण्णा) देशमुख शिवसेना, तालुका प्रमुख माढा (उ.बा.ठा.), प्राचार्य डॉ. महेंद्र कदम सर विठ्ठलराव शिंद महाविद्यालय, टेंभुर्णी, मा. श्री. सतीश (दादा) पाटील सदस्य, पंचायत समिती, कुर्डूवाडी, मा. श्री. प्रमोद कुटे मा. सरपंच, ग्रामपंचायत टेंभुर्णी, मा. श्री. संजय डांगे मा. सदस्य, जि. प. सोलापूर, मा. श्री. शिवाजी (आप्पा) पाटील संचालक, कृ. उ. बा. स. कुर्डूवाडी, मा. श्री. मुन्ना (आण्णा) साठे तालुका प्रमुख, शिवसेना (शिंदे गट), माढा, मा. श्री. रमेश (काका) पाटील संचालक, कृ. उ. बा. स. कुर्डूवाडी, मा. श्री. सुहास पाटील सर प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना, मा. श्री. संभाजी (गोटू) पाटील तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस माढा, मा. श्री. सचिन (बापू) जगताप जिल्हा अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड सोलापूर, मा. श्री. दिनेश जगदाळे प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, मा. श्री. विजय (भाऊ) कोठारी संस्थापक, शितल उद्योग समूह, मा. श्री. संजय (दादा) टोणपे जिल्हा समन्वयक, सकल मराठा, सोलापूर, मा. श्री. बाळासाहेब ढेकणे उद्योजक, सरपंच शिराळ (टें.), मा. डॉ. श्री. राहुल पाटील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ, टेंभुर्णी, मा. श्री. चित्तरंजन (आबा) पाटील चेअरमन, इंदापूर तालुका स. सोसायटी, मा. श्री. पोपट (तात्या) अनपट ज्येष्ठ नेते, बेंबळे, मा. श्री. दत्तात्रय (भाऊ) ढवळे मा. सरपंच, सापटणे, मा. श्री. विजय पवार सरपंच, बेंबळे, मा. श्री. दत्तात्रय (आण्णा) देवकर मा. सरपंच, टेंभुर्णी, मा. श्री. ऋषिकेश (बंटीनाना) बोबडे सदस्य, ग्रा. पा. टेंभुर्णी, मा. श्री. माणिक (अण्णा) लांडे ज्येष्ठ नेते, परिते, मा. श्री. भीमराव (आबा) ढवळे ज्येष्ठ नेते, सापटणे, मा. श्री. अमरसिंह शेंडे युवा नेते, भाजपा, मा. श्री. रामभाऊ वाघमारे संचालक, कृ. उ. बा. स. कुर्डूवाडी, मा. श्री. राजेंद्र परवत-पाटील मा. सरपंच, आकोले बु., मा. श्री. सतीश (आबा) सुर्वे जेष्ठ नेते, अकोले बु., मा. श्री. जयवंत पोळ उपाध्यक्ष, रिपाई प. महाराष्ट्र, मा. श्री. अमोलशेठ जगदाळे मा. अध्यक्ष, MIDC असोसिएशन, टेंभुर्णी, मा. श्री. विनोद पाटील सर उद्योजक, युवा नेते, मा. श्री. राजाभाऊ ढेकणे अध्यक्ष, MIDC असोसिएशन, टेंभुर्णी, मा. श्री. प्रभाकर परबत-पाटील संचालक, कृ. उ. बा. स. कुडूवाडी, मा. श्री. राजाराम येवले सचिव, अध्यक्ष, MIDC असोसिएशन, टेंभुर्णी, मा. श्री. डॉ. मनोज काळे उद्योजक, मोरया ग्रुप, मा. श्री. रवींद्र (दादा) श्रीखंडे मा. सरपंच, मिटकलवाडी, मा. श्री. नागनाथ (आप्पा) ढवळे मा. सरपंच, सापटणे, मा. श्री. राजाभाऊ शिंदे मा. सरपंच, वेणेगाव, मा. श्री. सोमनाथ (आप्पा) महाडीक-देशमुख उपाध्यक्ष, कुस्तीगीर संघ, सोलापुर, मा. श्री. भारत (बापू) नाळे मा. सरपंच वेणेगाव, मा. श्री. विजयसिंह (पिंटू) पाटील मा. सरपंच, परीते, मा. श्री. अरुण जगताप (मा. सैनिक) तालुका उपाध्यक्ष, मराठा सेवा संघ, माढा, मा. श्री. दीपक (आबा) देशमुख चेअरमन, लोकविकास डेअरी, पांगरे, मा. श्री. वैभव (भैय्या) महाडीक-देशमुख सदस्य, ग्रामपंचायत टेंभुर्णी, मा. श्री. सचिन लोढे पाटील जि. उपाध्यक्ष, रा. यु. काँग्रेस सोलापूर, मा. श्री. किरण कदम उपसरपंच, वेणेगाव आदी मान्यवर असणारं आहेत.
यशराज ॲग्रो (कस्तुराई फिड्स) आपल्या दुधउत्पादक बंधुंसाठी कार्यरत असून जास्त दुध देणाऱ्या गायी म्हशींसाठी आता आधुनिक व अद्ययावत पशुखाद्य कारखान्यातून नवीन उत्पादने आपल्यासाठी घेऊन आले आहेत. जास्त दुध देणाऱ्या गायी-म्हशींची क्षमता पूर्णपणे ओळखून त्याप्रमाणे त्यांचेकडून पुरेपूर दुध उत्पादन घेण्यासाठी कस्तुराई फिड्सचे पशुखाद्य आहारतज्ञांच्या देखरेखीखाली बनविलेले आहे. कस्तुराई फिड्स पशुखाद्य आपल्या विभागातील जनावरांच्या गरजा ओळखून बनविलेले आहे, तसेच दुध उत्पादक आपल्या गायी-म्हशींना खाऊ घालत असलेले हिरवा चारा, कोरडा चारा व सायलेज इत्यादी यांचे प्रमाण विचारात घेऊन बनविलेले आहे. कस्तुराई फिड्स पशुखाद्यात भारतातील व भारताबाहेरील देशातून प्रगत संशोधनाने तयार झालेल्या घटकांचाही अंतर्भाव केलेला आहे. दुभत्या गायी-म्हशींसाठी स्टीम तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेले हे कस्तुराई फिड्स चे पशुखाद्य आपल्या दुधउत्पादकांसाठी नजीकच्या पशुखाद्यविक्री केंद्रात/डेअरी मध्ये उपलब्ध आहे. कस्तुराई फिड्स जनावरांच्या विविध वयोगटातील गरजा लक्षात घेऊनच दूध सम्राट व डेअरी किंग अशा विविध गुणवत्तापूर्ण पशुखाद्यांची निर्मिती केली आहे. कस्तुराई फिडसचे पशुखाद्य खाऊ घालताना इतर कोणतेही पशुखाद्य खाऊ घालण्याची गरज नाही. कस्तुराई फिड्स चे पशुखाद्यातून जनावरांच्या शरीराला आवश्यक प्रथिने, कर्बोदके, फायबर, फॅटस, उर्जा, एकूण पचनीय पदार्थ इत्यादी पुरेपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच बायपास फॅट, बायपास प्रोटीन, टॉक्झीन बाईंडर यांचाही वापर योग्य प्रमाणात केलेला आहे.
कस्तुराई फीड्स पशुखाद्यामुळे जनावरांच्या दुध, फॅट व एस एन एफ यामध्ये वाढ होते. गायी म्हशींची तब्येत व प्रजननक्षमता टिकून रहाते. कालवडी योग्य वयात माजावर येतात व गाभ जातात. पशुआहाराचे ७५% पेक्षा जास्त पचन होते. जनावरांची रोगप्रतिकारक्षमता वाढते. तसेच जनावरांची त्वचा तजेलदार व चमकदार होते. असे अनेक फायदे या कस्तुराई फीड्स पशुखाद्यामुळे होतात.
तरी परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आणि दुग्ध व्यावसायीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन, आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.