आरोग्यताज्या बातम्यासामाजिक

शिवरत्नवरील मोहिते पाटील यांचे “एवढेच बघायचे राहिले होते…”, अशी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू…

मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाला वृक्षारोपण कार्यक्रमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश देण्याऐवजी झाडे लावा राजकारण वाचवा…

सदाशिवनगर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. 22/07/2025 रोजी सकाळी 09 वाजता वृक्षारोपण कार्यक्रम श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर साखर कारखान्याने आयोजित केलेला आहे.

विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील सदर कारखान्याचे चेअरमन आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे फोटो आहेत. इथपर्यंत ठीक आहे मात्र, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांचे बॅनरवर फोटो पाहून शिवरत्न वरील मोहिते पाटील यांचे एवढेच बघायचे राहिले होते, अशी राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. तर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाला वृक्षारोपण कार्यक्रमातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्याऐवजी झाडे लावा राजकारण वाचवा अशी भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह शिवरत्न वरील मोहिते पाटील यांना देवेंद्रजी फडणवीस यांचा अचानक पुळका आला, असाही सवाल भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून येत आहे. लोकसभा व विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष विसरलेला नाही.

वृक्षारोपण करून भाजपसमवेत नवीन प्लांटेशन करण्याचा शिवरत्न वरील मोहिते पाटील यांचा डाव नियती कधीच मान्य करणार नाही, अशी भाजपच्या वरिष्ठ व निष्ठावान नेत्याने बॅनर पाहून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom