शोकाकुल बातमी तरंगफळ येथील विरांजली संजय देशमुख हिचे दुःखद निधन…

भाजपचे माळशिरस तालुका माजी सरचिटणीस व विद्यमान नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख यांचे कन्यारत्न हरपले…
तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ, ता. माळशिरस येथील विरांजली संजय देशमुख हिचे वयाच्या 7 व्या वर्षी शनिवार दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे दुःखद निधन झालेले आहे. तिच्या पश्चात आजी, आई, वडील, बहिण, भाऊ, चुलता, चुलती असा परिवार आहे. भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका माजी सरचिटणीस व विद्यमान नातेपुते मंडल अध्यक्ष श्री. संजय कांता देशमुख यांची विरांजली कन्या होती.
विरांजली देशमुख हिच्यावर संजय देशमुख यांच्या तरंगफळ येथील निवासस्थाना शेजारील शेतामध्ये सकाळी 8.30 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

विरांजली हिच्या दुःखद निधनाने देशमुख परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. देशमुख परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि वीरांजली हिच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



