श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी सुरेश गायकवाड तर कार्याध्यक्षपदी गणेश गायकवाड
पंढरपूर (बारामती झटका)
श्रमिक पत्रकार संघ पंढरपूर (रजि.) या पत्रकार संघाच्या सन 2025 या नवीन वर्षाकरिता नव्याने पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे सुरेश गायकवाड तर कार्याध्यक्षपदी ए बी न्युज चे गणेश गायकवाड यांचेसह कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार महालिंग दुधाळे, दैनिक दिव्य मराठीचे घनशाम शिंदे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी दैनिक पुण्यनगरीचे सतीश बागल, खजिनदार म्हणुन दैनिक सकाळचे सुनील कोरके यांच्यासह खजिनदारपदी दैनिक पंढरी भूषणचे सावता जाधव अशाप्रकारे निवड करण्यात आली.
या नवीन पदाधिकारी निवडीवेळी उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, सुनील उंबरे, शिवाजी शिंदे, नवनाथ पोरे, मोहन डावरे, समाधान गायकवाड, सतीश बागल, भीमा व्यवहारे, बजरंग नागणे, सुधाकर कवडे, सूर्यकांत बनकर, शहाजी काळे, सचिन शिंदे यांचेसह श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरचे सर्व सभासद उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.