श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून विचारांचे शुद्धीकरण करा – डॉ. आंबेडकर
तांदुळवाडी येथे बौद्ध विहाराचे लोकार्पण व ग्रामशाखेचे उद्घाटन
अकलूज (बारामती झटका)
बौद्ध धम्माचे विचार समस्त मानव जातीला तारणारे आहेत. या विचारांचा आदर्श घेवून आदर्शवत मानवी जीवनाचा पाया रचला पाहिजे. बौद्ध धम्म हा मातृसत्ताक धम्म आहे. श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून प्रत्येकाने विचारांचे शुद्धीकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी व्यक्त केले.
तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथील भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सव वर्षाचे औचित्य साधून बौद्ध विहार लोकार्पण सोहळा, भारतीय बौद्ध महासभा शाखेचे उद्घाटन आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोकार्पण सोहळा व शाखेचे उद्घाटन डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राहुल चव्हाण, महिला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धम्मरक्षीताई कांबळे, सोलापूर पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, सरचिटणीस नागशेन माने, जोशनाताई कोरे, डॉ. सुरेश कोरे, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष हनुमंत जगताप, सरचिटणीस अशोक ओव्हाळ, कोषाध्यक्ष हनुमंत बंगाळे, सुनीलकुमार शिंदे, संजय तुपारे, नवनाथ कांबळे, बाळासाहेब भोसले, महिला विभाग सोलापूर पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष विद्याताई काटे, सरचिटणीस रेश्मा सरवदे, कोषाध्यक्ष अरुणा कांबळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष समाधान जाधव, गौतम धनवले, स्वप्निल प्रक्षाळे, करमाळा तालुका अध्यक्ष प्रशांत कांबळे, माढा तालुका कोषाध्यक्ष सोमनाथ चांदणे पाटील, सांगोला तालुकाध्यक्ष मोहन गौडदवडू, माळशिरस तालुकाध्यक्ष भिमराव गायकवाड, सरचिटणीस नागेश लोंढे, कोषाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, समता सैनिक दलाचे सुरेश धाईजे, समीर सोरटे, शंकर गायकवाड, बापू डावरे, चंद्रकांत भोसले, संतोष भोसले, दिलीप साळवे, बाबा नाईक, अविनाश चंदनशिवे, सांगली बटालियनचे अण्णा भोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, बौद्ध धम्माशिवाय आता पर्याय नाही, यासाठी प्रत्येकाने बौद्ध धम्मानुसार आचरण केले पाहिजे. बौद्ध धम्मच आता जगाला तारणार आहे. यावेळी बोलताना त्यांनी तांदूळवाडी येथील जयंतीचे कौतुक केले. यावेळी डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचा भारतीय बौद्ध महासभा तांदुळवाडी ग्राम शाखा यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका सहसचिव दुर्योधन काटे, शाखाध्यक्ष पुष्पा काटे, रमाबाई सावंत, समाधान कांबळे, नितुल भोसले, महेश धांडोरे, नारायण भोसले, प्रल्हाद धांडोरे, दत्ता भोसले,अर्जुन सुरवसे, सोनू धांडोरे, गणेश भोसले, भारत सरतापे, सुरज गायकवाड, गौतम भोसले, अतुल भोसले, पांडुरंग भोसले, खंडू खरे, सचिन गायकवाड, अनिकेत गायकवाड, दादा भोसले, ग्राम पंचायत सदस्य अनिल लोखंडे, अमोल भोसले, प्रल्हाद सावंत, सतीश सावंत, नितीन गायकवाड, भीमराव भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार डी. एस. गायकवाड यांनी केले तर शेवटी आभार समाधान भोसले यांनी मानले. सदर कार्यक्रमास तांदुळवाडी आणि पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.