तांदुळवाडी येथे २४ एप्रिल ते ३० एप्रिल रोजी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन
तांदुळवाडी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. २४ एप्रिल ते दि. ३० एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे. यामध्ये दररोज पहाटे ४ ते ६ काकडाआरती, सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ५ मंचरी गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ६.३० ते ७.३० प्रवचन, ७.३० ते ८.३० जेवण, सायंकाळी ९ वा. कीर्तन व हरिजागर अशा संपुर्ण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. २४ एप्रिल रोजी प्रवचन राणू मालक वासकर तसेच किर्तन नामदेव महाराज वासकर साकत याचे आहे. दि. २५ एप्रिल रोजी राणू मालक वासकर याचे प्रवचन तर किर्तन दत्ता महाराज भोसले सोलापूर यांचे होईल. दि. २६ एप्रिल रोजी कौस्तुभ राऊ मालक वासकर यांचे प्रवचन तर केशव महाराज मुळीक लासुर्णे यांचे किर्तन होईल. दि.२७ एप्रिल रोजी तुकाराम महाराज म्हस्के भोसे यांचे प्रवचन तर बापू साहेब महाराज नाईकनवरे यांचे किर्तन होईल. दि. २८ एप्रिल रोजी राणू मालक वासकर यांचे प्रवचन तर तुकाराम महाराज हजारे शिरूर यांचे किर्तन होईल. दि. २९ एप्रिल रोजी राणू मालक वासकर यांचे प्रवचन तर नवनाथ महाराज रोंगे हल्याळ यांचे किर्तन होईल. दि. ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ आनंद महाराज जाधव करमाळा यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल आणि सप्ताहाची समाप्ती करण्यात येईल.

सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी तांदुळवाडी गावातील सर्व भजनी मंडळी, सांप्रदायिक मंडळी तसेच गावातील नागरिक सहभागी होणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng