महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या कार्यक्षम मुख्याधिकारी पदी चरण कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली…
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. कौस्तुभ गव्हाणे यांची रहिमतपूर नगरपरिषद येथे बदली झाल्याने रिक्त जागी अतिरिक्त पदभार श्री. चरण कोल्हे यांच्याकडे देण्यात आला.
महाळुंग (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. कौस्तुभ गव्हाणे यांची सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगरपरिषद येथे प्रशासकीय बदली झाल्यानंतर मंगळवेढा नगरपरिषद येथे कार्यरत असणारे श्री. चरण कोल्हे यांच्याकडे महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेली आहे.
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीला कार्यक्षम मुख्याधिकारी यांची निवड करावी यासाठी महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे पदाधिकारी व नगरसेवक यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभेचे पाणीदार खासदार बबनदादा शिंदे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केलेली होती. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हाधिकारी यांनी कौस्तुभ गव्हाणे यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर श्री. चरण कोल्हे यांच्याकडे महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. श्री. चरण कोल्हे महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीमध्ये आल्यानंतर त्यांच्या सन्मान पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या रखडलेल्या कामांना गती येणार असून प्रशासनातील ढिसाळ व कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम बसणार आहे. प्रशासन लोकाभिमुख व गतिमान होईल अशी आशा पदाधिकारी व ग्रामस्थ यांना वाटत आहे.
श्री. चरण कोल्हे यांचा प्रशासनावर वचक व पकड आहे. कार्याची पद्धत लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन करण्याची असल्याने माळशिरस तालुक्यातील व माढा विधानसभा मतदारसंघातील महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीला कार्यक्षम मुख्याधिकारी मिळालेला असल्याने महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीमध्ये समाधानाचे वातावरण व्यक्त केले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.