ताज्या बातम्यासामाजिक

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग पुणे-पंढरपूर रोडवर माळशिरस तालुक्यात सीएनजी पंपाचा शुभारंभ..

मे. राजाराम मगर – पाटील पेट्रोलियम उद्योग समूह अभिमाधव मगर पाटील पेट्रोल पंप व सीएनजी CNG पंपाचा उद्घाटन समारंभ…

माळशिरस (बारामती झटका)

मे. राजाराम मगर – पाटील पेट्रोलियम उद्योग समूह अभिमाधव मगर पाटील पेट्रोल पंप व सीएनजी CNG पंपाचा सोमवार दि. 29/12/2025 रोजी सकाळी 10.15 या शुभ मुहूर्तावर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार श्री. राम विठ्ठल सातपुते, सामाजिक कार्यकर्त्या सौ‌. संस्कृतीताई राम सातपुते यांच्या शुभहस्ते पुणे-पंढरपूर रोड, काळा मारुती मंदिर शेजारी, अभिमाधव मगर पाटील फ्युएल स्टेशन येळीव, ता. माळशिरस येथे थाटामाटात व दिमाखात उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होणार आहे.

सदरच्या कार्यक्रमास प्रांताधिकारी विजया पांगारकर मॅडम, तहसीलदार श्री. सुरेश शेजुळ, डीवायएसपी श्री. संतोष वाळके, आयओसीएल रिजनल ऑफिसर देवदर्शी साहू, आयएमसी गॅस ऑफिसर श्री. मंथन शहा, सेल्स ऑफिसर तन्मय आनंदराज, विधान परिषद माजी आमदार श्री. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, दाते प्रशाला नातेपुते सेक्रेटरी ॲड. शिवाजीराव पिसाळ, शिवप्रसाद उद्योग समूहाचे चेअरमन शरदबापू मोरे, भाजपचे जेष्ठ नेते हनुमंतराव सुळ, माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष श्री. आप्पासाहेब देशमुख, भाजपा नातेपुते शहर अध्यक्ष श्री. राजेंद्र (बाॅस) पांढरे, शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख श्री. राजकुमार हिवरकर, अहिल्यादेवी पतसंस्था नातेपुते चेअरमन श्री. रघुनाथशेठ कवितके, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. दादासाहेब उराडे, श्री. परमेष्ठीशेठ गांधी, श्री. वीरेंद्रशेठ गुड्डू, श्री. अतुल बावकर, डॉ. माधव लवटे यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तरी आपण आग्रहाचे निमंत्रण समजून अगत्य येण्याचे करावे व आमचा आनंद द्विगुणीत करावा ही आग्रहाची विनंती असे, श्री. बाळासाहेब राजाराम मगर पाटील, श्री. लक्ष्मण राजाराम मगर पाटील, श्री. अरुण राजाराम मगर पाटील व समस्त मगर पाटील परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom