श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्यासारखा देवा भाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा सोहळा रंगणार..

देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीत पहिल्यांदा आमदार केसरी बैलगाडी शर्यतीतील गॅलरी व महिलांची परंपरा कायम…
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत भव्य ओपन मैदानात दोन लाखात लढत होणार…
पुरंदावडे (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत भव्य ओपन मैदानात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन मैदानाचे आयोजन श्रीक्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदावडे सदाशिवनगर ता. माळशिरस, येथील नवीन पालखी मैदान पुरंदावडे सदाशिवनगर या ठिकाणी संपन्न होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळ्यासारखा देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा सोहळा रंगणार असून ५ तारखेकडे बैलगाडी चालक-मालक, शौकीन यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सदरच्या मैदानामध्ये दोन लाख रोख रुपये व आकर्षक चषक मिळणार आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार श्री. रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत भव्य ओपन मैदानाचे आयोजन बुधवार दि. ५/३/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता पुरंदावडे-सदाशिवनगर ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे. सदरच्या मैदानात माळशिरस तालुक्यात पहिल्यांदा प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी व महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याची परंपरा आमदार केसरी स्पर्धेतील देवाभाऊ केसरी स्पर्धेमध्ये सुद्धा गॅलरी व बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सदरच्या भव्य ओपन मैदानामध्ये प्रथम क्रमांक २ लाख १ रु. रोख रक्कम व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक १ लाख ५० हजार १ रु. रोख रक्कम व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक १ लाख १ हजार १ रु. रोख रक्कम व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक ७० हजार १ रु. रोख रक्कम व आकर्षक चषक, पाचवा क्रमांक ५० हजार १ रुपया रोख रक्कम व आकर्षक चषक, सहावा क्रमांक ३० हजार १ रु. रोख रक्कम व आकर्षक चषक, सातवा क्रमांक २० हजार १ रु. रोख रक्कम व आकर्षक चषक, सेमी फायनलसाठी दोन नंबरला आलेल्या गाडीस १० हजार १ रु. उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे.
सदरचे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व शासनाच्या नियमानुसार होणार आहे. ऑनलाइन नोंद दि. २८/०२/२०२५. ते ०४/०३/२०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील. या स्पर्धेसाठी प्रवेश फी १५०० रु. आहे. सदरच्या बैलगाडी शर्यतीचे समालोचन सुनील मोरे पेडगाव, प्रताप झांजुर्णे तडवळे, विकास सर जगदाळे हे करणार आहेत. तर झेंडा पंच म्हणून राजेंद्रबापू धनावडे कोरेगाव हे काम पाहणार आहेत.

सदरच्या मैदानामध्ये संपर्क करण्याकरता पै. ज्ञानदेव पालवे 99 75 76 99 50, संजय मदने 98 90 66 88 81, हनुमंत मोहिते 99 70 52 19 90, सचिन पिसे 98 90 94 38 94 या नंबरवर संपर्क साधावा असे आयोजक श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदावडे सदाशिवनगर यांच्या वतीने बैलगाडी चालक मालक यांना करण्यात येत आहे. सदरच्या देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीसाठी बैलगाडी चालक-मालक, शौकीन यांनी उपस्थित राहावे, असे श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. महिलांसाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.