Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या साखरेचा महानैवेद्य शंभूमहादेवाला पायी जाऊन पोहोचणार का ?

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण समर्थनार्थ नेत्यांना गावबंदी केलेली आहे याचा फटका कारखान्याच्या नेतेमंडळींना बसणार का ?

सदाशिवनगर (बारामती झटका)

श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर या कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या साखर पोत्यातील नैवेद्य शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाला पायी जाऊन देण्याची प्रथा सुरू केलेली आहे. सध्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळावे यासाठी सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केलेली आहे‌. याचा फटका कारखान्याच्या चेअरमनसह नेते मंडळींना बसणार का ? यामुळे शंभू महादेवाला पायी जाऊन महानैवेद्य पोहोचणार का ?, अशी कुजबुज माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मराठा समाजामध्ये सुरू आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. पहिल्या साखर पोत्यातील महानैवेद्य शंभू महादेवास पायी जाऊन समर्पित करण्याची प्रथा आहे. मात्र, सध्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे तब्येत खालावलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह शहरी भागातील मराठा समाज आक्रमक झालेला आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी केलेली आहे. अशा वेळी साखरेचा महानैवेद्य पायी जाऊन शंभू महादेवास अर्पण करण्यास अडचण येणार आहे. साखळी उपोषण रात्रंदिवस सुरू असल्याने रात्री सुद्धा पायी चालत जाता येणार नाही. यासाठी वाहनातून साखरेचा महानैवेद्य शंभू महादेवास अर्पण करावा, असे जाणकार मंडळी यांच्यामधून बोलले जात आहे. सध्या तरी सदाशिवनगर परिसरात साखरेचा महानैवेद्य दबक्या आवाजात चर्चेचा विषय बनलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button