श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन सिंहांच्या विरोधात ढाण्या वाघ मैदानात….
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पडला का पाडला यापेक्षा, लढला कसा महत्त्वाचा आहे.
माळशिरस (बारामती झटका)
श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर, ता. माळशिरस, या साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार व विद्यमान चेअरमन रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व फोंडशिरस पंचक्रोशीतील सोसायटीच्या निवडणुकीतील हिंदकेसरी मधुकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीस सामोरे जात आहेत. श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पडला की पाडला, याच्यापेक्षा लढला कसा, याला महत्त्व प्राप्त झालेले आहे. दोन सिंहांच्या विरोधात ढाण्या वाघ मैदानात उतरल्याने निवडणुकीत रंगत वाढलेली आहे.
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था यामधून रणजितसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, मधुकर पाटील तीन अर्ज वैध झालेले आहेत. एकूण मतदान 38 आहे. त्यापैकी तीन संस्थांचे ठराव अप्राप्त असल्याने 35 मतदानामध्ये निवडणूक होणार आहे.
संस्था आणि संस्थेमधून ठरावाने मतदानाचा प्रतिनिधी
१. अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यार्थी वस्तीगृह जाधव वसंत पांडुरंग
२. अध्यक्ष, बाबासो पाटील स्थानिक स्कूल कमिटी खराडे पाटील हर्षवर्धन दीपकराव
३. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कृषी प्रत माने तुकाराम श्रीमंत
४. ट्रस्टी, आण्णासो गाडगीळ श्रीरामदेव संस्थान गोंदवले बु. परांजपे जयंत रघुनाथ
५. अध्यक्ष, जीवन शिक्षण मंदिर ठराव अप्राप्त
६. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ सदाशिवनगर ठराव अप्राप्त
७. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठान (टणू) ठराव अप्राप्त
८. पळसमंडळ वि. का. स. (विकास) सो. लि. चव्हाण नामदेवराव विश्वनाथ
९. पुरंदावडे वि. का. स. (विकास) सो. लि. ढोपे देविदास महादेव
१०. गुरसाळे वि. का. स. (विकास) सो. लि. गायकवाड गुलाब मारुती
११. कोथळे वि. का. स. (विकास) सो. लि. जाधव विजय सोपान
१२. दहिवडी वि. का. स. (विकास) सो. लि. जाधव संजय दिनकर
१३. श्री शंकर सहकारी साखर कारखाना सेवकांची पतसंस्था कदम कैलास पोपट
१४. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना मोहिते पाटील विजयसिंह शंकरराव
१५. फोंडशिरस वि. का. स. (विकास) सो. लि. मोहिते पाटील रणजितसिंह विजयसिंह
१६. मांडवे वि. का. स. (विकास) सो. लि. मोहिते पाटील अर्जुनसिंह मदनसिंह
१७. लोणंद वि. का. स. (विकास) सो. लि. मोहिते पोपट भगवान
१८. प्रतापसिंह मोहिते पाटील वि. का. सं. म. मिसाळ माणिकराव ज्ञानोबा
१९. वाघोली वि. का. स. (विकास) सो. लि. वाघोली मिसाळ बिभीषण जनार्दन
२०. गिरझणी वि. का. स. (विकास) सो. लि. गिरझणी मोहिते पाटील धवलसिंह प्रतापसिंह
२१. नारळाचीवाडी वि. का. स. (विकास) सो. लि. मगर चंद्रकांत विश्वनाथ
२२. मे. शेतकरी स. ख. वि. संघ लि. निंबाळकर नितीन रावसो
२३. इस्लामपूर (श्री संभाजी बाबा) वि. का. स. (विकास) सो. लि. पवार लक्ष्मण आगतराव
२४. अहिल्यादेवी वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील संदीप शामदत्त
२५. नातेपुते वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील अतुल राजेंद्र
२६. कारुंडे वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील तानाजी सायाप्पा
२७. दहिगाव वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील रामचंद्र दशरथ
२८. बोरगाव वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील धीरज प्रकाशराव
२९. माळेवाडी (विजयकुमार उर्फ बाबासाहेब पाटील) वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील राजकुमार विजयकुमार
३०. माणकी वि. का. स. (विकास) सो. लि. रणनवरे यशवंत भानुदास
३१. यशवंत वि. का. स. (विकास) सो. लि. रणवरे नंदकुमार सूर्यकांत
३२. एकशीव वि. का. स. (विकास) सो. लि. रुपनवर गोरख नामदेव
३३. कुरबावी वि. का. स. (विकास) सो. लि. रूपनवर संभाजी तुकाराम
३४. मोरोची वि. का. स. (विकास) सो. लि. साळुंखे सुधीर भिमराव
३५. माळखांबी वि. का. स. (विकास) सो. लि. शेळके मनोज भिमराव
३६. भांबुर्डी वि. का. स. (विकास) सो. लि. वाघमोडे शंकर यशवंत
३७. कळंबोली वि. का. स. (विकास) सो. लि. वाघमोडे संजय भीमराव
३८. शेंडेवाडी वि. का. स. (विकास) सो. लि. वाघमोडे मधुकर भानुदास असे 35 मतदार आहेत.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या कार्यकालापासून श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व आहे. उमेदवार माजी खासदार व विद्यमान आमदार आणि चेअरमन असणारे रणजीतसिंह मोहिते पाटील व माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या समोर उमेदवारी असताना सुद्धा फोंडशिरस गावचे हिंदकेसरी ढाण्या वाघ मधुकर पाटील यांनी उभा राहण्याचे धाडस केलेले आहे. निवडणुकीत जय पराभवाची परवा न करता निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पडला का पाडला यापेक्षा, लढला कसा हे महत्त्वाचे आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये मधुकर पाटील यांच्या उमेदवारीची नोंद होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर कोणत्या सिंहा विरोधात ढाण्या वाघ लढणार आहे, याचे चित्र स्पष्ट होईल.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
child porn watch
Great mix of humor and insight! For more, click here: READ MORE. Let’s discuss!