श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला…
२१ जागांसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २१ जागा संचालकांसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये व्यक्ती उत्पादक मतदार संघामध्ये माळशिरस, इस्लामपूर, नातेपुते, फोंडशिरस आणि बोरगाव या ५ गटामध्ये प्रत्येकी ३ जागा अशा एकूण १५ जागा आहेत. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी १, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रतिनिधी १, महिला राखीव प्रतिनिधी २, इतर मागासवर्ग प्रतिनिधी १, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गाचा प्रतिनिधी १ अशा ६ जागा अशा एकूण २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दि. २२/०१/२०२४ ते दि. २९/०१/२०२४ या मुदतीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात करायची आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी दि. ३०/०१/२०२४ रोजी सकाळी ११ ते छाननी संपेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात येणार आहे. तर उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी दि. ३०/०१/२०२४ ते दि. १४/०२/२०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना दि. १५/०२/२०२४ रोजी निशाणीचे वाटप करण्यात येणार असून अंतिम यादीचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे. तर दि. २५/०२/२०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी ज्या त्या गटांमध्ये निश्चित करतील ते मतदान केंद्राचे ठिकाण राहील. तर मतमोजणी दि. २६/०२/२०२४ रोजी सकाळी ८ ते मतमोजणी संपेपर्यंत करण्यात येणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.