श्री बिरोबा विजयी दसरा यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान

गोरडवाडी येथे पै. कालीचरण सोलनकर विरुद्ध पै. राहुल सुळ यांच्यात लढत होणार
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी येथे श्री बिरोबा विजयी दसरा यात्रेनिमित्त बळीराजा कुस्ती कमिटी व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्यावतीने भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन मंगळवार दि. ३०/९/२०२५ रोजी दुपारी ३ वाजता बिरोबा मंदिर गोरडवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
सदर मैदानामध्ये श्री. धनाजी शेठ गोरड, डी. जी. कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स अलिबाग, श्री. समाधान इलेक्ट्रिकल्स ट्रान्सफॉर्मर निर्मिती कंपनी माळशिरस प्रोप्रा. तानाजी हांडे, जरांडेश्वर शुगर मिल प्रा. लि. चिमणगाव यांच्यातर्फे वस्ताद विश्वास हरगुले यांचा पठ्ठा पैलवान कालीचरण सोलनकर विरुद्ध वस्ताद हेमंत आबा पाटील यांचा पठ्ठा पैलवान राहुल सुळ माळशिरस यांच्यात लढत होणार आहे. यामध्ये विजेत्या मल्लास विजय गोरड सरपंच यांच्यातर्फे ढाल देण्यात येणार आहे. कै. निवृत्ती शंकर गोरड यांच्या स्मणार्थ सरपंच, विजय दादा गोरड, श्री. शंभूराजे देवकाते संचालक जय मल्हार कारखाना, तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान, ज्ञानदेव कोकरे शिवशंभो फ्रुट कंपनी अकलूज यांच्यातर्फे वस्ताद काका पवार यांचा पठ्ठा पैलवान शुभम माने, पुणे विरुद्ध वस्ताद रवींद्र पाटील यांचा पठ्ठा पैलवान शशी बोर्गाडे, कोल्हापूर यांच्यात लढत होणार आहे.

श्री. अशोक दादा देशमुख शिवसेना शहर प्रमुख, डबल सरपंच किरण माने, भावी सरपंच माणिक कोकरे, अनुराज उद्योग समूह, श्री श्री सद्गुरू साखर कारखाना यांच्यातर्फे वस्ताद हेमंत आबा पाटील यांचा पठ्ठा पैलवान अभि ननवरे, काटी विरुद्ध वस्ताद स्वर्गीय दत्ता आप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पैलवान किरण मिसाळ, शिवनेरी यांच्यात लढत होणार आहे. श्री. किसन माणिक गोरड प्रगतशील बागायतदार, मामासाहेब हुलगे भावी सरपंच, काकासाहेब आवळे के. के. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, मातोश्री एंटरप्राइजेस, बळीराम चव्हाण सर प्रगतशील बागायतदार यांच्यातर्फे वस्ताद काका पवार यांचा पठ्ठा पैलवान समाधान गोरड, पुणे विरुद्ध वस्ताद अमृता भोसले यांचा पठ्ठा पैलवान अजित पाटील इचलकरंजी यांच्यात लढत होणार आहे. श्री. संतोष भाऊ हुलगे, देवा हुलगे, पिस्टन फॅन क्लब, सचिन पवार ग्रामपंचायत सदस्य इस्लामपूर, गणेश काटे भावी नगरसेवक, मच्छिंद्र कर्णवर वि. से. सदस्य, फरांदे ऍग्रो यांच्यातर्फे वस्ताद रावसाहेब मगर यांचा पठ्ठा पैलवान शुभम मगर, निमगाव विरुद्ध वस्ताद राजेंद्र शिंदे यांचा पठ्ठा पैलवान नाथा पवार, बेनापुर यांच्यात लढत होणार आहे.
या सह अनेक लढती या कुस्ती मैदानात होणार आहे. सदर कुस्ती मैदानाचे समालोचन युवराज तात्या केचे सर, हनुमंत शेंडगे, धनाजी मदने, सोमनाथ दडस हे करणार आहे.

या मैदानामध्ये आरोग्य दूत डॉ. एम. के. इनामदार, डॉ. प्रवीण मिसाळ (एम. एस. जनरल सर्जन), श्री. भीमराव शेंडगे साहेब, पी. आय. नितीन घोळकर, श्री. रामभाऊ पवार, परांडा उद्योजक आदींचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी मल्लसम्राट, वस्ताद, कुस्ती शौकीन, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बळीराजा कुस्ती कमिटी व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



