तंत्रज्ञानराजकारण

श्रीमंत रामराजे यांच्या राजे गटाची गळती थांबण्याची शेवटची आशाही मावळली – नगरसेवक अशोकराव जाधव

फलटण (बारामती झटका)

महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात तीस वर्षांची जुलमी सत्ता उलथवून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या दैदीप्यमान विजयानंतर फलटण तालुक्यातील राजे गटाला लागलेली गळती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गळती थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले होतील, पुन्हा आपली सातारा प्रशासनावर वचक राहील, अशी मनामध्ये आशा होती, पण, ही आशाही काल मावळली. त्यामुळे फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी फक्त कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे शिवाय पर्याय राहिलेला नाही.

गेल्या पाच वर्षांमध्ये माढा लोकसभा मतदारसंघासह फलटण शहर व तालुक्याचा विकास केलेला आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांसह जाणीवपूर्वक रखडवलेला पाण्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात आणलेला आहे.

विकासाभिमुख नेतृत्त्वाखाली फलटण तालुक्यातील व शहरातील अनेक राजकीय दिग्गज प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा प्रवेश लवकरच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ व फलटण तालुक्याचे भगीरथ कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे उपस्थितीत गजनान चौक, फलटण येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button