श्रीमती गोदावरी सदाशिवराव जाधव पाटील यांचे वार्धक्याने दुःखद निधन…

मळोली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंतराव जाधव पाटील यांना मातृशोक…
मळोली (बारामती झटका)
मळोली, ता. माळशिरस गावातील श्रीमती गोदावरी सदाशिवराव जाधव पाटील यांचे वयाच्या 102 व्या वर्षी मंगळवार दि. 11/11/2025 रोजी वार्धक्याने सकाळी 09.30 वाजता दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, जावई, सुना, नातवंडे, परतावंडे असा परिवार आहे. मळोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य हनुमंतराव जाधव पाटील यांच्या मातोश्री होत्या.
मळोली गावचे माजी सरपंच स्वर्गीय सदाशिवराव नरहरी जाधव पाटील उर्फ लिंबराज दादा यांच्या धर्म पत्नी होत्या. त्यांना आबई या टोपण नावाने ओळखत होते. आबई यांचे मूळ माहेर तांदुळवाडी येथील कदम पाटील घराण्यातील आहे. त्यांचे आजोबा मध्य प्रदेश येथील बऱ्हाणपूर येथे वास्तव्यास गेलेले आहेत. आबई यांचा जन्म बऱ्हाणपूर येथे झालेला आहे. त्यांचा विवाह मळोली गावातील लिंबराज दादा यांच्याशी झालेला होता. त्यांना हनुमंतराव, जयवंतराव, शंकरराव अशी तीन मुले व चार मुली आहेत. आबई यांचा सुसंस्कृत स्वभाव असून त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्यावर मळोली येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्याच दिवशी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम दि. 13/11/2025 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.
आबई यांच्या दुःखद निधनाने जाधव पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जाधव पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्व. आबई यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका न्यूज व कदम पाटील परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



