श्रीमती मालनबाई दिनकरराव निंबाळकर यांचे वार्धक्याने दुःखद निधन….

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाषराव दिनकर निंबाळकर यांना मातृषोक…
माळीनगर (बारामती झटका)
सवतगव्हाण, माळीनगर येथील श्रीमती मालनबाई दिनकर निंबाळकर यांचे रविवार दि. 02/11/2025 रोजी वयाच्या 105 व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व शंकरराव मोहिते पाटील शेतकरी सहकारी बँकेचे माजी चेअरमन सुभाषराव दिनकरराव निंबाळकर उर्फ सुभाषदादा यांच्या मातोश्री होत्या. स्वर्गीय मालनबाई निंबाळकर यांच्यावर आजच दुपारी 12 वाजता सवतगव्हाण येथील वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

स्वर्गीय मालनबाई निंबाळकर यांच्या आत्म्याला शांती लाभो व निंबाळकर परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



