श्रीपूर येथे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

श्रीपूर (बारामती झटका) बी. टी. शिवशरण
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे वतीने माळशिरस तालुका आरपीआयचे वतीने आज श्रीपूर मध्ये पक्षाचा 68वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष के. डी. धाईंजे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटक एस. एम. गायकवाड, आयटी सेल तालुका प्रमुख प्रविण साळवे, तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके, युवक तालुका उपाध्यक्ष बाबूराव भोसले, श्रीपूर शहर अध्यक्ष गणेश सावंत, सरचिटणीस संजय खरे, रमेश भोसले, उपाध्यक्ष गुडम भालशंकर, अजित मोरे, सुनिल ओहाळ, भास्कर बनसोडे सर, अभि वाघमारे, संपादक अण्णा भोसले, विनोद रणदिवे, सुधीर भोसले, ओंकार सरतापे, भगवान भोसले, ज्येष्ठ पत्रकार बी. टी. शिवशरण आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी निळ्या टोप्या, निळे उपरणे, हातात पक्षाचे निळे झेंडे घेऊन गगनभेदी घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयजयकार घोषणा दिल्या. यावेळी रिपब्लिकन पक्षाचा विजय असो, राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नावाने आक्रमक व जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवून पक्ष बळकट करून पक्ष वाढीसाठी प्रामाणिक राहिले पाहिजे असे आवाहन केले. तसेच तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी रिपब्लिकन पक्षाचे ध्येयधोरण व रामदास आठवले यांची भूमिका यांवर विचार व्यक्त केले. माळशिरस तालुक्यातील सर्व पदाधिकारी, श्रीपूर, महाळुंग, अकलूज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर, सदाशिवनगर परिसरातील अनेक कार्यकर्ते पक्षाच्या वर्धापन कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, प्रदेश युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष के. डी. धाईंजे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त श्रीपूरमध्ये वातावरण निळ्या झेंड्याखाली आरपीआयमय झाले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



