ताज्या बातम्यासामाजिक

श्रीराम साखर कारखान्याच्या प्राधिकृत अधिकारी म्हणून श्रीमती प्रियंका आंबेकर उपविभागीय अधिकारी फलटण यांची नियुक्ती…

माढा लोकसभेचे कार्य तत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश…

फलटण (बारामती झटका)

प्रादेशिक सहसंचालक, (साखर), पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयाकडून दि. 20/03/2025 रोजी जा. क्र. प्राससंसा/प्रशासन/श्रीराम ससाका/कलम 77 अ(ब)/527/2025 नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ (1) (ब) अन्वये श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित, फलटण, ता. फलटण, जि. सातारा या कारखान्याचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी श्रीमती प्रियंका विठ्ठल आंबेकर, उपविभागीय अधिकारी, फलटण, ता. फलटण, जि. सातारा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नीलिमा गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक, (साखर) पुणे विभाग, पुणे, यांनी आज दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित, फलटण, ता. फलटण, जि. सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 अन्वये नोंदविण्यात आलेली असून तिचा नोंदणी क्रं. जी. 261 दि.24/07/1954 असा आहे व सदरहू कारखाना या कार्यालयाचे वैधानिक कार्यकक्षेत येत असून कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दि. 17/02/2025 रोजी संपुष्टात आलेली आहे.

विश्वास भोसले यांनी मा. उच्च न्यायालय यांचेसमोर याचिका स्टॅम्प क्रं. 9177/2025 दाखल केली आहे. सदर याचिकेमध्ये नमूद हरकतीचे गांभीर्य लक्षात घेवून, सदर याचिकेसंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचा निर्णय होईपर्यंत सदरहू कारखान्याची निवडणूक पुढे ढकलेली आहे. त्यामुळे अनिश्चित कालावधीकरीता नविन संचालक मंडळ अस्तित्वात येवू शकत नसल्याने जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे संस्थेवर महाराष्ट सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ (1) (ब) परिस्थिती निर्माण झालेली आहे व त्या ठिकाणी प्राधिकृत अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक झालेले आहे.

ज्याअर्थी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ नुसार समितीच्या सदस्याची नियुक्ती, नवीन समिती, समितीची घटना करीत असते त्यावेळी कोणताही सदस्य निवडून न येणे व नवीन समितीने पदभार न स्वीकारणे यावेळी प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती बाबत नमूद केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77अ (1) (ब) मध्ये पुढीलप्रमाणे तरतूद आहे. “कोणत्याही संस्थेच्या समितीचा किंवा तिच्या कोणत्याही सदस्याचा पदावधी संपला म्हणून किंवा इतर कोणत्याही कारणासाठी निवडणूक घेण्यात आली व त्यावेळी रिकाम्या जागा भरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व किंवा कोणतेही सदस्य निवडण्यात कसूर झाली आहे.

दि. 07/03/2025 चे पत्रासोबत रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी संसद सदस्य (लोकसभा) माढा यांचेकडील दि. 06/03/2025 रोजीचे निवेदनामध्ये नमूद केलेनुसार, सदरहू कारखान्याने मतदार याद्यांचे सादर केलेले प्रारुप हे सहकार कायदा व उपविधी प्रमाणे तयार न करता निवडणूक अधिकारी यांना सादर केल्या. त्यावर हरकती घेण्यात आल्या परंतु, मतदार याद्या दुरुस्त न करता सदोष मतदार याद्या सादर केल्या त्यामुळे सदर निवडणूक कायदेशीर व पारदर्शी होणार नाही. सबब प्रशासक नियुक्ती करणेस विनंती केलेली आहे. पत्रामध्ये संदर्भीय प्रशासक नेमणूकीबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाचे स्तरावर योग्य ती कार्यवाही करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ज्याअर्थी कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे आणि कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीच्या मतदार यादीबाबत तक्रार आहे आणि मा. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये भविष्यात होणारी निवडणूक ही निष्पक्ष व पारदर्शीपणे होणे आवश्यक आहे. सदर निवडणूक प्रक्रिया ही मध्य टप्यावर आली असल्याने व ही निवडणूक निष्पक्ष व पारदर्शीपणे घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नेमणे आवश्यक आहे

त्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 (अ) (1) (ब) मधील तरतूदीनुसार प्रस्तुत आदेश तातडीने जारी करणे आवश्यक असल्याने सदर आदेश जारी करण्यापूर्वी त्याची नोटीस जाहीर करावयाची आवश्यता नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 (अ) (1) (ब) मधील तरतूदीन्वये मला प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारानुसार नीलिमा गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक, (साखर) पुणे विभाग, पुणे, श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित, फलटण, ता. फलटण, जि. सातारा या कारखान्याचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी श्रीमती प्रियंका विठ्ठल आंबेकर, उपविभागीय अधिकारी, फलटण, ता. फलटण जि. सातारा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे असे आदेश दिले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button