सीआयडी व आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट असतानाही केवळ राजकीय सूडबुद्धीने आ. रोहितदादा पवार यांच्यावर ईडी ची कारवाई.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या राज्यभर सर्व जिल्ह्यात घंटानाद आंदोलन करणार – रविकांत वरपे प्रदेश प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मुंबई (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विकासनशील नेतृत्व आ. रोहितदादा पवार यांची उद्या दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी ईडी चौकशी होणार आहे. यापूर्वी ईडीने २४ जानेवारी रोजी आ. रोहितदादांची चौकशी केली होती. सदर चौकशी ही राजकीय सुडापोटी आहे. कारण कारखाना, लिलावाच्या बाबतीत सीआयडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे. पण केवळ राजकीय सूड घेण्यासाठी ईडी चौकशी करत आहे.
आमदार रोहित पवार यांनी मागील चार वर्षाच्या काळात वाढणारी बेरोजगारी, पेपरफुटी व त्यावर कायदा, कंत्राटी नोकरभरती, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग यासह असंख्य प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. तसेच, राज्यातील युवकांचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून सरकारच्या पातळीवर लढा उभा करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. या लढ्याला महाराष्ट्रातून जनतेचा व युवकांचा मिळणारा पाठिंबा पाहून केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांच्या आडून राजकीय सूड उगवण्याचे काम सध्या भाजपा करत आहे.
याच हुकूमशाही कारभाराच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व राज्यातील जिल्ह्यांमध्ये जिल्हा पातळीवर घंटानाद आंदोलन करणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेचा व महाराष्ट्रातील संपूर्ण युवा वर्गाचा पाठिंबा आमदार रोहितदादा पवार यांच्या पाठीशी असल्याने या सर्व संघर्षाच्या लढाईत विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आ. रोहितदादा पवार बाहेर पडतील.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Hello my loved one I want to say that this post is amazing great written and include almost all significant infos I would like to look extra posts like this