समतावादी विचारांचा प्रसार करत अंधश्रद्धा, कर्मकांड व अनाठायी खर्चाला विरोध करून समाजप्रबोधनात्मक सत्यशोधक विवाह घडावेत – मंत्री छगन भुजबळ

फुले एज्युकेशन तर्फे नागपूर येथे पोहनकर आणि बोराटे यांचा 55 वा. विवाह सोहळा संपन्न !!!
नागपूर (बारामती झटका)
फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.6 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री सिद्वेश्वर सभागृह , नागपूर येथे सत्यशोधक विकास दत्तात्रय बोराटे ,फलटण आणि सत्याशोधिका प्रतिक्षा सुरेश पोहनकर यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने मोफत 55 वा. सत्यशोधक विवाह सोहळा शानदार पणे पार पडला.याप्रसंगी मी सावित्रीमाई फुले बोलतेय हे नाटक चंद्रपूर च्या आयु.गायत्री अनिलकुमार रामटेके यांनी प्रबोधनात्मक सादर केल्याने सोहळ्यास मोठी रंगत आली.
या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हयांनी नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पार पाडले. यावेळी वधू वर याना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम भेट नागपूरचे नामवंत वकील केशव काकपुरे व रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते देण्यात आले. तसेच यावेळी वधू वर यांचे आई वडील तसेच मामा मामी यांना व एकपात्री कलाकार गायत्री रामटेके यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने फलटण साखर कारखान्याचे संचालक मा.पोपट जाधव व नागपूरचे एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्थेचे सचिव मा.विलास येसकर यांचे शुभहस्ते सन्मान पत्र ,शाल, श्रीफळ आणि 199 मान्यवरांना महात्मा फुले गीत चरित्र व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले.
या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी राज्याचे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वधूवर यांना शुभेच्छा संदेश देताना म्हंटले की हा सोहळा सामाजिक परिवर्तनाचा आदर्श नमुना असून अशा उपक्रमामुळे समाजात, समता, बंधुता, व मानवतावादी मुल्ये अधिक दृढ होत आहे. समतावादी विचारांचा प्रसार केल्याने अंधश्रद्धा, कर्मकांड, व अनाठायी खर्चाला विरोध करून साध्या सुसुस्कृत आणि समाजप्रबोधनात्मक पद्धतीने सत्यशोधक विवाह संस्थेने घडवून आणला आणि ही चळवळ महाराष्ट्रासह राज्याबाहेरही पोहोचवली ही अभिमानाची बाब आहे असे आयोजक रघुनाथ ढोक यांचे देखील कौतुक करीत हे कार्य व्यापक होवो आणि समाजाला सतत योग्य दिशा देत राहो, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी सुंगधी फुलाच्या पाकळ्या अक्षता म्हणून वापरण्यात आले तर प्रतिक्षा आणि विकास या वधूवरांचे हातात भारताचे राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान आणि महात्मा फुले समग्र वाड्मय घेऊन पारंपारिक पद्धतीने फुलांच्या पायघड्यांवरून आगमन होऊन त्यांचे हस्ते सुरुवातीला ग्रंथाचे पूजन व सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले आणि स्री शिक्षणाचे आध्यप्रनेत्या सावित्रीमाई फुले यांच्या अर्धपुतळ्यास भव्य पुष्पहार अर्पण करण्यात आला तर बाकी मान्यवरांनी फुले वाहून पूजन केले.तसेच गायत्री रामटेके यांनी संविधानाचे हक्क अधिकार कर्तव्ये याची सखोल माहिती देत उद्देशिका वाचन केले नंतर वधूवरांना संविधान ग्रंथ भेट दिला. तर विधीकर्ते रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक विवाह आधुनिक काळाची अत्यंत गरज आहे सांगून , वधुवर यांना सात फेरे प्रसंगी आपल्या कर्तव्याची शपथा देऊन समई चे दीपप्रज्वलन केले आणि आपण यापुढे कसे रहावे ,वागावे या शपथ पत्राचे वाचन व्यक्तिगत दोघाकडून सर्वांचे समोर घेतले. त्यानंतर महात्मा फुले रचित मंगलाष्टकेचे गायन केले. त्यामुळे नागपूर मधील संस्थेचे वतीने प्रथम होणाऱ्या या सत्यशोधक विवाह सोहळयाचे सर्वांनी कौतुक करीत बोराटे व पोहनकर यांचे देखील अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



