सोहाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी “मी ज्ञानी होणार” या उपक्रमात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत…

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
अंकोली तालुक्यातील मोजे सोहाळे येथील जगताप वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी “मी ज्ञानी होणार” या उपक्रमात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे.
जि. प. प्रा. शाळा जगताप वस्ती (सोहाळे) येथील शाळेमध्ये राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला (ता. कळंब, जि. धाराशिव) आयोजित ‘मी ज्ञानी होणार’ या उपक्रमांतर्गत सामान्यज्ञानावर आधारित अंतिम परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत संस्थेतर्फे २६ जूनपासून सामान्यज्ञानावर आधारित रोज नियमित पाच प्रश्न पाठविले जात होते. या प्रश्नांवर आधारित प्रत्येक महिन्याला एक सराव चाचणी घेतली जात होती. ११ जानेवारीस अंतिम परीक्षा झाली. शंभर गुणांच्या या परीक्षेत शाळेतील तिसरी ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी भरभरून यश मिळविले.
या राज्यस्तरीय परीक्षेत प्रथम क्रमांक अनुराधा घुले, द्वितीय संस्कृती जगताप, तृतीय क्रमांक सृष्टी जगताप हिने मिळवला. यांचेसह आराधना घुले, प्रवीण जगताप, शुभम जगताप, शिवम जगताप, श्रेया गायकवाड, गौरी लामतुरे, स्नेहल घुले, स्वरांजली जगताप या १२ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ही परीक्षा २३ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे झाली. या परीक्षेत कु. संस्कृती उमेश जगताप, अनुराधा अर्जुन घुले, आराधना अर्जुन घुले या विद्यार्थिनींनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन तालुक्याचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी, अंकोली केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार राऊत, मुख्याध्यापक ज्ञानदेव डांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष अमर जगताप, राजाराम जगताप यांनी केले. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक सविता ओहोळ, जावेद आत्तार, निर्मला केदारलिंगे, अनुप्रिता रुही यांचे मार्गदर्शन मिळाले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.