सोलापूर ग्रामीण पश्चिममधील १४ मंडल अध्यक्ष निवडीसाठी सोमवारी मुलाखती – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या खांद्यावर पक्षाची नवी जबाबदारी देण्यासाठी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात १४ मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात प्रत्येक मंडलमध्ये ३०० पेक्षा जास्त बुथ संख्या असल्याने मंडल अध्यक्षांना बूथ प्रमुखांशी वेळेत संपर्कात राहणे व वेळ देणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर व बार्शी या विधानसभा मतदारसंघात ११५ ते १४० इतक्या बूथचे एक मंडल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात १४ मंडले तयार करण्यात आली आहेत.
सांगोला विधानसभेसाठी सांगोला उत्तर मंडलमध्ये महूद जि.प. गट, एखतपूर जिल्हा परिषद गट, जवळा जिल्हा परिषद गट सांगोला नगरपालिका, सांगोला दक्षिण मंडलमध्ये घेरडी जिल्हा परिषद गट, कडलास जिल्हा परिषद गट, चोपडी जिल्हा परिषद गट, कोळा जिल्हा परिषद गट, पंढरपूर मंडलमध्ये भाळवणी जिल्हा परिषद गट, करमाळा मंडलमध्ये करमाळा नगरपरिषद, वीट जिल्हा परिषद गट, पांडे जिल्हा परिषद गट, ग्रामीण करमाळा मंडलमध्ये कोर्टी जिल्हा परिषद गट, वांगी जिल्हा परिषद गट, केम जिल्हा परिषद गट, कुर्डूवाडी मंडलमध्ये कुर्डवाडी नगरपरिषद भोसरे जिल्हा परिषद गट, कुर्डू जिल्हा परिषद गट, म्हैसगाव पंचायत समिती गण, माढा पूर्व मंडलमध्ये माढा नगरपंचायत, मोडनिंब जिल्हा परिषद गट, उपळाई जिल्हा परिषद गट, मानेगाव जिल्हा परिषद गट, माढा पश्चिम मंडळमध्ये टेंभुर्णी जिल्हा परिषद गट, बेंबळे जिल्हा परिषद गट व माळशिरस तालुक्यातील गावे, करकंब मंडलमध्ये करकंब जिल्हा परिषद गट, रोपळे जिल्हा परिषद गट, गुरसाळे जिल्हा परिषद गट, भोसे जिल्हा परिषद गट, माळशिरस पूर्व मंडळमध्ये यशवंतनगर जिल्हा परिषद गट, संग्रामनगर जिल्हा परिषद गट, माळीनगर जिल्हा परिषद गट, वेळापूर जिल्हा परिषद गट, तांदुळवाडी जिल्हा परिषद गट, माळशिरस पश्चिम मंडळमध्ये दहिगाव जिल्हा परिषद गट, फोंडशिरस जिल्हा परिषद गट, मांडवे जिल्हा परिषद गट, कन्हेर जिल्हा परिषद गट, पिलीव जिल्हा परिषद गट, माळशिरस नगरपंचायत, नातेपुते नगरपंचायत, अकलूज मंडलमध्ये अकलूज शहर आणि बार्शी ग्रामीण व बार्शी शहर अशी १४ मंडले तयार करण्यात आली आहेत.

या १४ मंडळ अधीक्षक अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.