सोलापूर ग्रामीण हद्दीतील वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधुत शेंडगे यास M.P.D.A. कायद्यान्वये येरवाडा करागृहात स्थानबध्द

वेळापूर (बारामती झटका)
मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण हददीतील शरिराविषक तसेच वाळुतस्करी, अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करावे तसेच प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट आदेश केले होते. वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधुत नारायण शेंडगे, रा. पिसेवाडी, वेळापूर, ता. माळशिरस, याचे विरूध्द शरिराविषक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, अवैध सावकारी करणे, घातक हत्याराचा वापर करून दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, हत्याराचा वापर करून जबर इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, असे 9 गुन्हे वेळापूर तसेच अकलुज पोलीस ठाणे येथे दाखल आहेत. त्याच्यावर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. तरी देखील पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कारवाई करुन सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती.
स्थानबध्द इसम अवधुत शेंडगे याच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी, यांच्या मार्फतीने सहा. पोलीस निरीक्षक, वेळापूर पोलीस ठाणे यांनी मा. जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे M.P.D.A. कायदयान्वये प्रस्ताव सादर केला होता.
मा. श्री. कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी M.P.D.A. कायदयान्वये स्थानबध्द करणेबाबत आदेश निर्गमित केल्याने अवधुत शेंडगे यास येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. सोलापूर ग्रमीण हद्दीतील वाळुतस्करी, शरिराविषक व मालाविषयक, अवैधदारू विक्री करणाऱ्या इसमांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असुन त्यांच्या विरुध्द M.P.D.A. कायदयान्वये यापुढे देखील अश्याच स्वरूपाची प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, यांनी दिला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज, मा. श्री. अभिजीत पाटील, अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, यांच्या मार्गदर्शनाखाली व. पोलीस निरीक्षक, मा. श्री. संजय जगताप, ने. स्थानिक गुन्हे शाखा, सहा. पोलीस निरीक्षक श्री. भाउसाहेब गोसावी, पो.उप.नि. शेळके, पो.हे.कॉ. अनिस शेख, पो.हे.कॉ. मोहन मनसावाले, सपोफौ खंडगाळे, पोहेकॉ यश आनंदपुरे, पो.हे.कॉ. पाटील, पो.कॉ. माळी, पो.कॉ. पांढरे, पो. कॉ. हिंगनगावकर, पो.कॉ. काटे, तसेच मा. जिल्हादंडाधिकारी कार्यलयाकडील श्री. उत्कर्ष देवकुळे, ना. तहसिलदार, श्री. विलास म्हेत्रे यांनी कामकाज केला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



