ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सोलापूर ग्रामीण पश्चिम महिला मोर्चा जिल्हा चिटणीसपदी सौ. अनिता नवनाथ जाधव यांची नियुक्ती…

सोलापूर जिल्हा पश्चिम महिला मोर्चा अध्यक्ष सौ. सुरजा योगेश बोबडे जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर केली…

मळोली (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पश्चिम महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुरजा योगेश बोबडे यांनी मळोली, ता. माळशिरस गावातील भाजपच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिता नवनाथ जाधव यांची सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आलेली आहे. सदर निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका महिला अध्यक्षा सौ. नीता मामासाहेब मगर यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ संस्कृतीताई सातपुते, पिलीव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव, उपाध्यक्ष शशांक उर्फ भैया पाटील, भारतीय जनता पार्टी माळशिरस मंडल अध्यक्ष श्री. नितीन मोहिते यांच्या सूचनेवरून सौ. अनिता नवनाथ जाधव यांची सोलापूर ग्रामीण पश्चिम महिला मोर्चा जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिता नवनाथ जाधव यांनी निवडणुकीत जोमाने काम केलेले होते. पिलीव जिल्हा परिषद गटात घरोघरी जाऊन हळदी, कुंकू व भारतीय जनता पक्षाचा प्रचार केलेला होता.

मुळातच सौ. अनिता जाधव यांच्या सासर व माहेरमध्ये राजकीय वारसा आहे. शिवशंकर सोसायटीचे चेअरमन व मळोली गावचे पंधरा वर्षे ग्रामपंचायत सदस्य असणारे अरुण श्रीमंत पवार यांच्या भगिनी आहेत तर मळोली गावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते जयसिंह रामचंद्र जाधव यांच्या सुनबाई आहेत.

मळोली गावचे युवा नेतृत्व प्रगतशील बागायतदार नवनाथ जाधव यांच्या धर्मपत्नी आहेत.

सौ. अनिता जाधव यांच्यावर जिल्हा चिटणीस पदाची दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून तळागाळामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवण्यासाठी निश्चितपणे भरीव कार्य करतील. सौ. अनिता जाधव यांच्या निवडीबद्दल माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button