सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी मोहिते पाटलांसह दिग्गज नेत्यांना मोठा झटका
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २३८ कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी, एका चार्टड अकाउंटंटकडून वसुली करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी काढले आहेत.
तत्कालीन संचालक मंडळातील ३५ जणांकडून एकूण २३८ कोटी ४३ लाख ९९९ हजाराच्या बेकायदेशीर कर्जाची १२ टक्के व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी जारी केले आहेत. विभागीय सहनिबंधक यांनी काढलेल्या आदेशामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटील, दीपक आबा साळुंखे, राजन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गजांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात २०१० साली राजेंद्र राऊत यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर कलम ८३ आणि ८८ नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाले होते. संचालक मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संस्थांना कर्ज घेतले. मात्र त्या कर्जाची परतफेड केली नसल्याने बँक अडचणीत आल्याचा ठपका या चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता.
त्यामुळे या प्रकरणी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळासह अधिकारी आणि चार्टड अकाउंटंट यांना देखील जबाबदार धरण्यात आले होते. या चौकशी अहवालानंतर आता विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी कलम ९८ अन्वये जबाबदार धरण्यात आलेल्या संचालक मंडळाकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.
वसुलीस पात्र असलेल्यांची यादी खालील प्रमाणे –
दिलीपराव सोपल – ३० कोटी २७ लाख २८ हजार १२२ रुपये
विजयसिंह मोहिते – पाटील – ३ कोटी ०५ लाख ५४ हजार २४२ रुपये
दीपक साळुंखे – पाटील – २० कोटी ७२ लाख ५१ हजार २७० रुपये
सुधाकरपंत परिचारक – ११ कोटी ९३ लाख ०६ हजार २७७ रुपये
प्रतापसिंह मोहिते – पाटील – ३ कोटी १४ लाख ६५ हजार ९४७ रुपये
राजन पाटील – ३ कोटी ३४ लाख २१ हजार ३५७ रुपये
संजय शिंदे – ९ कोटी ८४ लाख ४४ हजार ७९९ रुपये
बबनराव शिंदे – ३ कोटी ४९ लाख २३ हजार ०४१ रुपये
दिलीप माने – ११ कोटी ६३ लाख ३४ हजार ५६८ रुपये
रणजितसिंह मोहिते – पाटील – ५५ लाख ५४ हजार ६६० रुपये
चांगोजीराव देशमुख – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
एस. एम. पाटील – ८ कोटी ७१ लाख ८७ हजार ६७८ रुपये
चंद्रकांत देशमुख – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
जयवंतराव जगताप – ७ कोटी ३० लाख ०३ हजार ५४२ रुपये
रामचंद्र वाघमारे – १ कोटी ४८ लाख ६७ हजार ५१६ रुपये
सिद्रामप्पा पाटील – १६ कोटी ९९ लाख ८० हजार ३९३ रुपये
सुरेश हसापुरे – ८ कोटी ०३ लाख ०७ हजार ५५९ रुपये
बबनराव अवताडे – ११ कोटी ४४ लाख ८१ हजार ४१२ रुपये
राजशेखर शिवदारे – १ कोटी ४८ लाख ६७ हजार ५१६ रुपये
अरुण कापसे – २० कोटी ७४ लाख ७८ हजार ५१६ रुपये
संजय कांबळे – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
बहिरू वाघमारे – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
सुनील सातपुते – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
रामदास हक्के – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
चांगदेव अभिवंत – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
भर्तरीनाथ अभंग – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
विद्या बाबर – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
सुनंदा बाबर – १० कोटी ८४ लाख ७२ हजार ५५९ रुपये
रश्मी दिगंबरराव बागल – ४३ लाख २६ हजार १०९ रुपये
नलिनी चंदेले – ८८ लाख ५८ हजार ६६३ रुपये
सुरेखा ताटे – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
सुनीता बागल – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
किसन मोटे – ५ लाख रुपये
कें. आर. पाटील – ५ लाख रुपये
संजय कोठाडीया – ९१ लाख १२ हजार ३६९ रुपये
एकूण – २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपये
महाराष्ट्र माझा साभार
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
Hi there, just bexame aware off your bblog through
Google, and ound that itt iss trupy informative. I’m goinna watch out ffor brussels.
I’ll appreciaye iff yyou continue tuis in future. Numerous people wull bee
benefitd from your writing. Cheers!
My famoly memberds always ssay thawt I am klling my time her att
net, xcept I know I am getting knowledge all the ime by reading thes good articles.
Blue Techker This is my first time pay a quick visit at here and i am really happy to read everthing at one place