सोलापूर जिल्हा नियोजन समिती व भाजपच्या संघटनात्मक पदाची जबाबदारी निष्ठावंतांना मिळणार तर गद्दारांना थारा नाही…
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या भाजप सदस्यता अभियानाची उद्दिष्टाकडे वाटचाल….
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते येथील मघुर मिलन मंगल कार्यालय, नातेपुते येथे माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी सदस्यता अभियान भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत व सरचिटणीस चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झालेला होता. सदरच्या कार्यक्रमामध्ये लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांना माळशिरस तालुक्यात 71 हजार सभासदांच्या नोंदणीचे आवाहन केलेले होते. त्याप्रमाणे माळशिरस तालुक्यात भाजप सदस्यता अभियानाची उद्दिष्टाकडे दमदार वाटचाल सुरू आहे. लवकरच उद्दिष्टपूर्तीचा सोहळा संपन्न होईल. नेते व कार्यकर्त्यांना आवाहन केलेले होते, 1000 सभासद करणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे महाराष्ट्र प्रभारी चव्हाण यांचे अभिनंदनचे पत्र मिळणार. तर दीड हजार सभासद करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व भाजपचे जेष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत चहा पिण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी तालुक्यातील छोट्या छोट्या गावांमधील सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी 200, 250, 500, 1000,1500 सभासदांचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या रणरागिनी महिला भगिनींनी सुद्धा उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. माळशिरस विधानसभेत माजी मंत्री दिलीप कांबळे यांना भाजपकडून उमेदवारी दिलेली होती. त्यावेळेस 5000 मते पडलेली होती. त्यामुळे माळशिरस तालुक्यात 5000 मताचे भाजप आहे, असे विरोधकांकडून वारंवार राजकीय आरोप केले जात होते.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी भाजपचे माळशिरस तालुक्यात 01 लाख 08 हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन तालुक्यात अंतर्गत छुपी गद्दारी होऊनसुद्धा भाजपची ताकद दाखवून दिलेली आहे. निकालानंतर श्रीराम बंगला येथे कार्यकर्त्यांची रीघ लागलेली होती. निष्ठावान कार्यकर्ता हा पराजयाची परवा न करता नेत्यांच्या पाठीशी ठाम उभा राहत असतो. माळशिरस तालुक्यातील निष्ठावान भाजपच्या जनतेने दाखवून दिलेले आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे निष्ठावान व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा नियोजन समिती, राज्य, जिल्हा व तालुका शासकीय कमिट्या आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक पदाची जबाबदारी निष्ठावंतांना मिळणार तर गद्दारांना थारा नाही, असा केंद्रीय व राज्यातील नेतृत्वाने घेतलेला निर्णय आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाचे प्राबल्य राहणार आहे. भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर असल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थामधील नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी भक्कमपणे उभी राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पक्षीय नेतृत्व ठरवत असताना कार्यकर्ता जुना किंवा नवा हा फरक न करता क्रियाशील कार्यकर्त्याला ताकद दिली जाते. आपण ग्रामीण भागातील शेतकरी बांधव आहोत, आंब्याचे झाड किती वर्षाचे आहे याला महत्त्व नाही. झाड आंबे किती देते, हे पाहिले जाते. एखादे जुने झाड आंबे देत नसेल आणि भिरूड लागला असेल तर शेतकरी त्याला शेतामधून किंवा बांधामधून काढून टाकतात. तसेच पक्षामध्येसुद्धा गद्दारी करणारे भिरूड लागलेल्या आंब्यासारखे बाजूला सारले जातात, हा राजकीय इतिहास आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय निर्णय घेत असताना माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते या त्रिमूर्ती लोकप्रतिनिधीनी एकमेकांशी समन्वय करून निष्ठावंतांना सोलापूर जिल्हा नियोजन समिती, महाराष्ट्र शासनाच्या राज्य, जिल्हा, तालुका, शासकीय समित्या व भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक पदाची जबाबदारी निष्ठावान कार्यकर्त्यांना मिळणार असल्याने सदस्यता अभियानामध्ये चढाओड लागलेली पहावयास मिळत आहे. भाजपचे जोमाने काम करणारे भविष्यात जोमात असणार तर विधानसभेला कोमात काम केलेले नेते व कार्यकर्ते कोमातच जाणार हा राजकारणाचा इतिहास आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.