ताज्या बातम्याराजकारण

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आ. जयाभाऊ गोरे यांना करावे, जिल्ह्याची मागणी..

माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघात पुन्हा भाजपचे कमळ फुलविण्याकरता दुष्काळी जनतेचा आधारवड आमदार जयाभाऊ गोरे यांना संधी द्यावी…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेऊन महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात कोणालाही मंत्री करा मात्र, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सातारा जिल्ह्याचा मानबिंदू, दुष्काळी जनतेचा आधारवड आमदार जयाभाऊ गोरे यांनाच करावे, अशी जिल्ह्याची मागणी होत आहे.

माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघात पुन्हा भाजपचे कमळ फुलवण्याकरता दुष्काळी जनतेचा आधारवड आमदार जयाभाऊ गोरे यांना संधी द्यावी, अशी सोलापूरच्या जनतेतून मागणी होत आहे.

माढा लोकसभा व सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झालेले आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचे राजकारणात वेगळ्या पद्धतीने प्रत्येक निवडणुकीत वेगळी समीकरणे घडत आहेत. त्यामुळे माढा व सोलापूर लोकसभेची जागा पुन्हा भाजपच्या ताब्यात येण्याकरता खऱ्या अर्थाने आमदार जयाभाऊ गोरे यांच्यासारख्या तरुण व उमद्या कार्यकर्त्यांची गरज आहे. महाराष्ट्राच्या विधानभवनात चौथ्यांदा प्रवेश करीत असलेले आमदार जयाभाऊ गोरे यांनी सत्ता असो अथवा नसो, माण खटाव मतदार संघासाठी कायम कडवी झुंज दिलेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात खऱ्या अर्थाने आमदार जयाभाऊ गोरे यांना पालकमंत्री केल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल व राजकारणातील चाणक्य यांचे करेक्ट कार्यक्रम होईल, यासाठी महायुतीतील घटकपक्ष व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सोलापूरच्या जनतेची मागणी लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व आमदार जयाभाऊ गोरे यांच्याकडे द्यावे, अशी सर्वसामान्य व तळागाळातील लोकांमध्ये भावना निर्माण झालेली आहे.

आमदार जयाभाऊ गोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी, आपण मंत्री होऊन सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व घ्यावे अशा पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या होत्या. निश्चितपणे बारामती झटकाचा अंदाज खरा होईल, असा आत्मविश्वास वाटत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button