सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर…..

पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचे पहिले पाऊल लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा गुरुवार दि. 23 जानेवारी 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दौरा होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पहिल्यांदाच माळशिरस तालुक्यात येत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी सदिच्छा भेट देणार असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे माळशिरस तालुक्यात पहिले पाऊल श्रीराम बंगला येथे पडणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार श्री. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्याकडे दिल्यानंतर ते पहिल्यांदाच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शिखर शिंगणापूर येथून शंभू महादेवाचा आशीर्वाद घेऊन माळशिरस तालुक्यात आगमन होणार आहे. नातेपुते येथे महायुतीच्या सर्व पक्षांच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौकामध्ये जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम बंगला या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन पंढरपूर तालुक्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेण्यासाठी रवाना होणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.