सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंचाची पहिली ग्रामपंचायत ईव्हीएम समर्थनार्थ ठराव करणारी ठरली…
खुडूस ता. माळशिरस ग्रामपंचायत थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक नामदेवराव ठवरे पाटील यांनी ईव्हीएम समर्थणार्थ मासिक मीटिंगमध्ये ठराव करून जिल्ह्यात सुरुवात केली आहे
खुडूस (बारामती झटका)
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर ईव्हीएम मतदान प्रक्रियेवर महाविकास आघाडीने पराभवाचे खापर फोडून राज्यात व देशात नंगानाच सुरू केलेला आहे. माळशिरस तालुक्यात मारकडवाडी येथून ईव्हीएम हटाव सुरुवात झाली. मात्र, माळशिरस तालुक्यातूनच खुडूस गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक नामदेवराव ठवरे पाटील यांनी ईव्हीएम समर्थनार्थ ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया राबवावी असे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावाने ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये ठराव केलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंचाची पहिली ग्रामपंचायत ठराव करणारी ठरलेली आहे.
खुडूस ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये मतदान प्रक्रिया राबविणे बाबत ईव्हीएम मशीन बाबत वेगवेगळ्या संभ्रम व शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्या महाराष्ट्र व देशाची वाटचाल आधुनिक दिशेने सुरू आहे. परंतु, काही संघटना व राजकीय पक्षाकडून ईव्हीएम बाबत विरोधात्मक भूमिका घेतल्या जात आहेत. तरी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया न राबविता ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी खुडूस ग्रामपंचायत जाहीर पाठिंबा देत आहे, असे खुडूस ग्रामपंचायतच्या मासिक सभा दि. 11/12/2024 रोजी सकाळी 09 वाजता ग्रामपंचायत कार्यालय सरपंच श्री. विनायक नामदेवराव ठवरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या त्या सभेस ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर अध्यक्ष यांच्या परवानगीने विषय घेण्यात आला. सदरच्या विषयाला सूचक व अनुमोदक यांनी व उपस्थितांनी ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. खुडूस ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक नामदेवराव ठवरे पाटील यांनी सरपंच होण्याचा बहुमान मिळविलेला आहे तर ईव्हीएम समर्थणार्थ पहिला ठराव करण्याचा सुद्धा बहुमान खुडूस ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी घेतलेला असल्याने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारकडून खुडूस ग्रामपंचायत विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सुद्धा ईव्हीएम समर्थणार्थ केलेल्या ठरावाचे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे अभिनंदन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.