सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामधील रेशन दुकानदार यांच्यासह गोरगरीब कार्डधारक यांच्या समस्या लवकरच सोडविण्यात याव्यात – शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी
पंढरपूर (बारामती झटका)
मागील गेल्या दोन महिन्यापासून ईपास मशीनवर सर्व्हर डाऊनने धान्य वाटपात अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील ईपास मशीनद्वारे धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात संबंधितांशी चर्चा करून या समस्याबाबत तातडीने उपाययोजना किंवा निर्देश करण्यात यावेत. रेशन दुकानदार यांचेसह गोरगरीब रेशन कार्डधारकांच्या समस्या लवकरात लवकर सोडून द्यावात. स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी चर्चा केली होती. महाराष्ट्र राज्यात ५२ हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ईपास मशीनद्वारे धान्य वितरण करत असून मागील दोन महिन्यापासून ईपास मशीनवर धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणी व धान्य वितरण करता येत नाही.
मोल मजुरी करणाऱ्या लाभार्थीनाच तासनतास दुकानांवर बसून राहावे लागते. याबाबत तालुका स्तरापासून जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर तक्रार देऊनही कोणत्याही सकारात्मक उपाययोजना न झाल्याने राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आणि गोरगरीब रेशन कार्डधारक यांचा खूप त्रास सहन करावा लागला आहे. सध्या शेतीच्या मशागतीचे दिवस असून शेतकरी मंजुर कार्डधार त्रस्त झाले आहेत. आमचा दुकानदारांशी वाद होत आहेत. त्यामुळे संबंधितांशी चर्चा करून ईपास मशीन सर्व्हर प्रॉब्लेममुळे धान्य वाटप करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना व्हावी, धान्य वाटपचा मोबदला मिळाला पाहिजे.
इतर समस्याबाबात लवकरच मार्ग काढण्यात यावा आणि धान्य मोजून ५० किलो ५०० ग्राम मिळाले पाहिजे. इ-केवायसीचा मोबदला मिळाला पाहिजे. अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अन्न व धान्य वितरणमंत्री छगन भुजबळ यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व रेशन दुकानदार गोरगरीब कार्डधारकांना न्याय मिळावा. अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.