सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बँड मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याच्या गेटवर..

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वाजवणाऱ्या बँडला वर्षा बंगला कायमचा बंद, बँड वाल्यांची राजकीय उपासमारीला सुरुवात..
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी व अनुभव सिद्ध असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यावर सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बँड गेटवर उभा आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणाऱ्या बँडला वर्षा बंगला कायमचा बंद झाल्याने बँडवाल्यांची राजकीय उपासमारीला सुरुवात, अशी महाराष्ट्र, मुंबईसह सोलापूर जिल्ह्यात, माळशिरस तालुक्यात खुमासदार चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप व महायुतीच्या उमेदवारांना राजकीय घडामोडीमध्ये पीछेहाट झालेली होती. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकारणात मुरब्बी असणारे देवेंद्रजी फडणवीस यांनी मायक्रो सूक्ष्म नियोजन लावून विधानसभेच्या निवडणुकीत भाजप व महायुतीच्या जास्तीत जास्त आमदारांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले होते. काही पक्षातीलच गद्दारांमुळे थोड्याफार फरकाने भाजप व महायुतीचे आमदार यांचा पराभव झालेला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे निष्ठावान व पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पराभव झालेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जिव्हारी लागलेला होता.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



