सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान….
सोलापूर (बारामती झटका)
उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या व रेशीम शेतीतून लक्षाधीश झालेल्या शेतकऱ्यांना मा. पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी विनित पवार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये 1 हजार 17 शेतकऱ्यांकडे 1 हजार 260 एकरावर रेशीम उद्योग चालू असून त्यापैकी मौजे निमगाव, ता. माळशिरस, येथील शेतकरी जगन्नाथ पंढरीनाथ मगर यांनी घेतलेली अंडीपुंज संख्या – 2 हजार 200, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 1 हजार 760, प्राप्त रक्कम 10 लाख 8 हजार 480 रु., जयसिंग साहेबराव मगर यांनी घेतलेली अंडीपुंज संख्या – 2 हजार 800, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 2 हजार 110, प्राप्त रक्कम 11 लाख 34 हजार रु., हणमंत तुकाराम सांगोलकर मौजे भंडीशेगाव, ता. पंढरपूर यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या – 3 हजार 200, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 2 हजार 257, प्राप्त रक्कम 13 लाख 20 हजार 345 रु., वैभव भिमराव काळे मौजे कंदर, ता. करमाळा यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या – 3 हजार, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 2 हजार 680 प्राप्त रक्कम 14 लाख 7 हजार 431 रु., सौदागर पांडुरंग पांडव मौजे पिरटाकळी, ता. मोहोळ यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या – 2 हजार 50, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 1 हजार 701 प्राप्त रक्कम 8 लाख 33 हजार 490 रु. तसेच श्रीशैल मलकाप्पा नंदगाव मौजे हत्तीकणबस, ता. अक्कलकोट यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या – 1 हजार 50, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 897, प्राप्त रक्कम 4 लाख 72 हजार 560 रु. इतकी आहे.
सध्या जिल्ह्यातील महारेशीम नोंदणी अभियान चालू असून रेशीम शेतीसाठी तुती लागवड करण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांनी नाव नोंदणी जिल्हा रेशीम कार्यालय मोजे हिरज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, येथे करावी. तसेच रेशीम उद्योगामधून शेतकऱ्यांनी लक्षाधीश व्हावे. लवकरच सोलापूर जिल्ह्यामध्ये soil to Fabric प्रकल्प राबवीत आहोत. ज्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वत:चा रेशीम कोष विक्री करणे सोईचे होणार आहे व सोलापूर जिल्ह्यातील कुशल विणकरांना कपडा निर्मीतीपर्यंत रोजगार उपलब्थ होईल. ज्यामुळे सोलापूर जिल्ह्याची आर्थिक उन्नती हाईल. असे आवाहनही जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी विनित पवार यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.