ताज्या बातम्याराजकारण

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न होणार…

चंद्रकांतदादा यांचे बोट धरून भाजपमध्ये आलेले रणजीतसिंह मोहिते पाटील वोट मागण्यासाठी उपस्थित राहणार का ? उलट सुलट चर्चेला उधान…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक टेस्ट परीक्षा तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा मुख्य परीक्षा असणार आहे.

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे विद्यमान कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बुधवार दि. 24/04/2024 रोजी दुपारी 01.00 वाजता चैतन्य मंगल कार्यालय, दहिगाव रोड नातेपुते, ता. माळशिरस येथे आयोजित केलेली आहे. सदरच्या बैठकीस तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे बोट धरून भारतीय जनता पक्षामध्ये आलेले व सध्या भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वोट मागण्यासाठी उपस्थित राहणार का, अशा उलट सुलट चर्चेला राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलेले आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची बैठक टेस्ट परीक्षा आहे तर, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची माळशिरस येथे होणारी जाहीर सभा रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी मुख्य परीक्षा असणार आहे, अशी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू आहे.

भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवारासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार केलेले होते. रणजीतसिंह यांच्याकडे माढा विधानसभेची तर धैर्यशील यांच्याकडे माळशिरस विधानसभेची निवडणुक प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली होती. लोकसभेच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा व पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून माढा लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणुकीस उभे राहिलेले आहेत.

आ. रणजीतसिंह मोहिते पाटील निवडणुकीच्या रणधुमाळीत सक्रिय झालेले नाहीत. गनिमी काव्याने महायुतीच्या विरोधी नेत्यांच्या घरी गुपचूप भेटत असल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले होते‌. माढा लोकसभा मतदार संघात महायुतीच्या अनेक बैठका झाल्या, त्यामध्ये आ. रणजीतसिंह मोहिते पाटील सहभागी झालेले नव्हते. प्रथमच माळशिरस तालुक्यात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीची बैठक संपन्न होत आहे. सदरच्या बैठकीस उपस्थित राहतील का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

चंद्रकांत दादा यांची बैठक टेस्ट परीक्षा तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची मंगळवार दि. 30/04/2024 रोजी माळशिरस येथे जाहीर सभा होणार आहे. पालकमंत्री व पंतप्रधान यांच्या सभेस भाजपचे विधान परिषदेचे आमदार उपस्थित न राहिल्यास भाजप पक्ष त्यांच्यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button