सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे….
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची फेरनिवड करण्यात आली तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 8 सप्टेंबर 2024 रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले, त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मावळते खजिनदार विनोद कामतकर यांनी वार्षिक जमा-खर्च सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. दरम्यान, अध्यक्ष पदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली तर त्यास संगमेश जेऊरे, विश्वभूषण लिमये यांनी अनुमोदन दिले. विक्रम खेलबुडे यांनी बाराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडविला आहे. दरम्यान, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. पत्रकारांसाठी विविध उपयोगी उपक्रम राबविले. पत्रकारांसाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सर्वांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विक्रमवीर नूतन अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली…
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार ॲड. राजकुमार नरोटे यांनी काम पाहिले. निवडीनंतर अध्यक्ष व सरचिटणीस यांचा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. नरोटे, माजी अध्यक्ष संजीव पिंपरकर, चंद्रशेखर कव्हेकर, प्रशांत जोशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. आयत्या वेळी पत्रकारांनी विविध सूचना मांडल्या. यावेळी सदस्य, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षीचे नूतन पदाधिकारी व कार्यकारणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : विक्रम खेलबुडे
सरचिटणीस : सागर सुरवसे
खजिनदार : किरण बनसोडे
कार्याध्यक्ष : कृष्णकांत चव्हाण
उपाध्यक्ष : उमेश कदम, आफताब शेख, अजित उंब्रजकर, नितीन पात्रे, अजित संगवे, रतन (अप्पा) बनसोडे
चिटणीस : तात्या लांडगे, संगमेश जेऊरे, वेणूगोपाल गाडी
सहचिटणीस : अजित बिराजदार, रामेश्वर विभुते
सदस्य : श्रीनिवास दुध्याळ, राजकुमार माने, विजय थोरात, राजकुमार वाघमारे, रणजित जोशी, विजयकुमार राजापुरे, विजय साळवे, सचिन जाधव, विकास कस्तुरे, संदीप येरवडे, डॉ. समीर इनामदार, सलमान पिरजादे, विरल गायकवाड, रोहन नंदाने, मनोज हुलसुरे, विश्वभूषण लिमये, व्यंकटेश दोंता, मुजम्मिल शहानुरकर, रोहन श्रीराम, सुदर्शन भालेराव, अमोल साळुंखे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to more added agreeable from you By the way how could we communicate
Tech to Force I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.