सोलापूर विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मंजूर

जिल्हाधिकारी : सुरक्षा निरीक्षण प्रणालीच्या मान्यतेनंतर मिळाली मंजुरी
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर विमानतळावरून विमान टेक ऑफ आणि लँडिंगसाठी डीजीसीएने बुधवारी दुपारी परवाना मंजूर केला असून, लवकरच आता सोलापुरातून विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) ११ व १२ सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने विमानतळाची पाहणी व तपासणी झाली. यामध्ये विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डीजीसीएकडून करण्यात आलेली होती. विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरणकडून पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्यामुळे, बुधवारी दुपारी डीजीसीएने सोलापूर विमानतळावरून विमान टेक ऑफ व लँडिंगचा परवाना (लायसन्स) मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
त्यापूर्वी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो) च्या अधिकाऱ्यांनी होटगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली. विमानतळ प्राधिकरणकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आलेले होते. त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी आली होती.

लवकरच कार्यवाही
तपासण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीजीसीएकडून सोलापूर विमानतळाला बुधवारी विमान लँड होणे को टेक ऑफ करण्याची – लायसन्स प्राप्त झालेले आहे. सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.