सोलापूर येथे राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्थाचालक पुरस्काराचे वितरण शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शुभहस्ते होणार – प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
येत्या पाच मे रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय संस्थाचालक मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ यांनी दिली.
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय संस्थाचालक मेळावा आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्थाचालक पुरस्कार वितरण सोहळा सोमवार ५ मे रोजी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शुभहस्ते होणारआहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरामधून दोन हजाराहून जास्त संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक बांधव उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये राज्यातील ५० संस्थाचालकांना आदर्श संस्थाचालक म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक तथा एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष, पुणे बोर्ड सदस्य प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.