सोलापूर येथे वरिष्ठ सहायक अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक

सोलापूर (बारामती झटका)
लोकसेवक श्री. घनश्याम अंकुश मस्के वय ४३ वर्षे, पद वरिष्ठ सहायक नेम शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर वर्ग ३. रा. फ्लॅट नं. ३३. मरगु अपार्टमेट, यशवंत मिल जवळ, अक्कलकोट रोड, सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे ४०,०००/- रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून रु. २०,०००/- लाच स्वतः स्विकारल्यामुळे सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिट, पुणे परिक्षेत्र यांच्या अधिपत्याखाली सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
याबद्दल थोडक्यात माहिती अशी की, यातील तक्रारदार यांची सेवा २४ वर्षे पुर्ण झाल्याने त्यांना देय असणारे निवडश्रेणी प्रस्ताव मान्यतेकरीता दि. २५/१०/२०२३ रोजी योग्य मार्फतीने आलोसे यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. सदर बाबत तक्रारदार हे आलोसे यांच्याकडे पाठ पुरावा करीत होते. तक्रारदार यांचे निवड श्रेणी मान्यतेसाठी आलोसे यांनी यापुर्वीच रु. ५०००/- स्विकारुन रु. ३०,०००/- आणुन दिल्यावर मान्यतेसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगीतले होते. आज रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये आलोसे यांनी रु. ४०,०००/- लाचेची मागणी करुन तडजोडीअंती रु. ३२०००/- लाचेची मागणी करुन रु. २०,०००/- पहिला हप्ता म्हणुन स्वतः स्वीकारली आहे. यावरुन वर नमुद लोकसेवक यांचे विरुध्द सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक लाप्रवि, पुणे व डॉ. शीतल जानवे-खराडे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकार श्री. उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. सोलापूर यांच्या सापळा पथकाने श्री. गणेश पिंगुवाले, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार ए.एस.आय. कोळी, पो.ना. संतोष नरोटे, पो.कों. गजानन किणगी व चालक पो.ह. राहुल गायकवाड, सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्यांच्या वतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.
संपर्क पत्ता – पोलीस उपअधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर.
संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल [email protected]
ऑनलाईन तक्रार ॲप acbmaharashtra.net
संपर्क टोल फ्री क्रमांक १०६४
दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.