सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडत व्यापारी देसाई ट्रेडर्स यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक…..

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेणार असल्याचे पीडित शेतकरी संतोष जाधव यांचा निर्णय…
वेळापूर (बारामती झटका)
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडत व्यापारी देसाई ट्रेडर्स यांच्याकडून वेळापूर, ता. माळशिरस येथील शेतकरी संतोष जाधव यांचा दि. 04/12/2023 रोजी 69 कांद्याच्या बॅगा व्यापाऱ्याकडे घेऊन गेलेले होते. 7039 किलो कांद्याचे एक लाख 33 हजार 725 रुपये झालेले होते. हमाली तोलाई भाडे 3955 वजा करून एक लाख 29 हजार 470 रुपये देसाई ट्रेडर्स यांच्याकडे होते. त्यापैकी 29 हजार 470 रुपये रोख दिलेले होते. एक लाख रुपये देसाई ट्रेडर्स यांच्याकडे येणे बाकी आहे. संतोष जाधव यांनी अनेक वेळा समक्ष भेट घेतली, फोन केले, मात्र देसाई ट्रेडर्स यांच्याकडून वर्ष होऊन सुद्धा अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्याने संतोष जाधव यांची फसवणूक झाल्याची भावना झालेली असल्याने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन कैफियत मांडणार आहेत.

गरीब परिस्थितीतून कांदा उत्पादन घेतलेले होते. मुलांचे शालेय शिक्षण करता येईल, फाटक्या प्रपंचाला हातभार लागेल, असा उद्देश ठेवून रात्रंदिवस कष्ट केले. तळहाताच्या फोडासारखे कांदा पीक जपले मात्र, देसाई ट्रेडर्स यांच्यामुळे रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. कांदा पिकासाठी बियाणे, औषधे व मजुरी यासाठी उसणवारीने पैसे घेतलेले होते, त्यांचे पैसे परत देण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अशा अडत व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करावे जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेणार असल्याचे पिढीत शेतकरी संतोष जाधव यांनी बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



