कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

सोमवारी शेतकऱ्यांनी आपल्या अडीअडचणी सोडविण्याकरता तालुका कृषी कार्यालयात यावे – आंदोलनवीर अजितभैया बोरकर.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर तालुका कृषी अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न होणार…

माळशिरस (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी काका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी माळशिरस तालुका कृषी कार्यालयात अधिकारी हजर नसल्यामुळे ठिय्या आंदोलन केलेले होते. सदरच्या आंदोलनाची दखल घेऊन सोमवार दि. २४/४/२०२४ रोजी सकाळी ११ वा. माळशिरस तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे.

सदरच्या बैठकीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीचे सोडवणूक करण्याकरता तालुक्यातील शेतकरी यांनी तालुका कृषी कार्यालयात उपस्थित राहावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी तालुक्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केलेले आहे.

पावसाला सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे. यंदाच्या खरीप हंगामात बळीराजाला दिलासा मिळाला असताना कृषी खात्याच्या चुकीच्या कारभारामुळे यंदाच्या खरीप हंगामाला फटका बसत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुका कृषी कार्यालयात अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधण्याकरता कार्यालयात गेल्यानंतर अधिकारीच उपस्थित नव्हते. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली होती. कारण खरिपाच्या पेरण्या सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अगोदरच पेरण्या झालेल्या आहेत. त्या पिकांना मिश्र खते देणे गरजेचे असताना मंडल कृषी कार्यालय असणाऱ्या केंद्रावरून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक युरिया दिला जात नाही.

सदरचा युरिया काळ्या बाजारात विकला जात आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना मिश्र खते घेताना दुकानदारांकडून लिंकिंग करून इतर औषधी व खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत‌. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या उद्देशाने अजितभैया बोरकर यांनी स्वाभिमानी संघटनेचे शिलेदार यांच्या समवेत या आंदोलन केलेले होते.

सदरच्या आंदोलनाचे वेळी कार्यालयीन कृषी अधिकारी शरद सावंत यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात सोमवारी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक संघटनेतर्फे केली जाईल. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले होते. त्या अनुषंगाने सोमवारी माळशिरस तालुका कृषी कार्यालयात अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले प्रश्न घेऊन उपस्थित राहावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button