सौ. दिपाली रावसाहेब वाघमोडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन…

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील सौ. दिपाली रावसाहेब वाघमोडे यांचे बुधवार दि. 25/12/2024 रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर म्हसवड-माळशिरस रोडवरील अनुसया नगर येथे राहत्या निवासस्थानाशेजारी अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, दोन मुले असा परिवार आहे.
सेवानिवृत्त मंडल अधिकारी बाळासाहेब वाघमोडे तथा तलाठी भाऊसाहेब यांच्या सुनबाई होत्या. तर रावसाहेब उर्फ पप्पू वाघमोडे यांच्या धर्मपत्नी होत्या. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा व दशक्रिया कार्यक्रम दि. 27/12/2024 रोजी पार पडलेला आहे.
त्यांच्या दुःखद निधनाने वाघमोडे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. वाघमोडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय सौ. दिपाली यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.