भगवंत मंदिर समिती तर्फे रेल्वे महाप्रबंधकांचा सत्कार

बार्शी (बारामती झटका)
बीड, बार्शी, कुर्डुवाडी व दौंड येथील कवच प्रणाली व रेल्वे स्टेशनची अंतर्गत तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे रेल्वेचे महाप्रबंधक श्री. धर्मवीर मीना व श्री. मनिंंदर उप्पल प्रधान मुख्य सिग्नल और दुरसंचार अभियंता हे दौऱ्यावर आले होते.

या दौऱ्याच्या वेळी रेल्वेचे महाप्रबंधक श्री. धर्मवीर मीना व श्री. मनिंंदर उप्पल प्रधान मुख्य सिग्नल और दुरसंचार अभियंता यांनी बार्शीच्या भगवंत मंदिराला भेट दिली. त्यावेळी त्यांचा सत्कार भगवंत मंदिर समितीचे सरपंच श्री. दादासाहेब बुडूख यांच्या हस्ते श्रीफळ व भगवंताची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

सोलापूर विभागाचे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक श्री. मारुती घोळवे, हवालदार श्री. दादा नवगिरे, श्री. दीपक पलंगे, श्री. योगेश उबाळे आदी उपस्थित होते..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



