सौंदणे येथे पालखी मार्गाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकित भाजपाच्या पाठीशी उभे राहावे – भाजपा सोलापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण
मोहोळ (बारामती झटका)
केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत आहे. अत्यंत आवश्यक असलेल्या रस्त्याची कामे लक्ष देऊन केली जात आहेत. आपल्या भागाचा अधिक विकास व्हावा म्हणून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकित भाजपाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन भाजपा सोलापूर जिल्हा पूर्व चे अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील पोखरापूर जिल्हा परिषद गटातील सौंदणे येथे पालखी मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. शंकरराव वाघमारे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधुन मंजूर झालेल्या पालखी मार्ग या रस्त्याचे सिमेंट काँक्रिट करणे या कामाचे भूमिपुजन करण्यात आले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, मोहोळ नगरपरिषदेचे प्रभारी सुशील क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, जिल्हा चिटणीस महेश सोवनी, राज्य परिषद सदस्य संजीव खिलारे, माजी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, युवा मोर्चाचे अंकुश अवताडे, माजी सरपंच भारत भाऊ सुतकर, माजी उपसरपंच संतोष नामदे, रमेश आबा गोडसे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष गोरख भानवसे, ग्राम पंचायत सदस्य रमेश भानवसे, ॲड. विशाल चौधरी, उल्हास माने, माऊली भगरे, संजय वाघमोडे, सागर दादा वाघमारे, विकास कोकाटे, सौ. दिपाली कोरे, सागर भोसले, अभिनव लोखंडे, परमेश्वर माने, तुकाराम भानवसे, चंद्रकांत वाघमारे, महेश बाळू भानवसे, तानाजी सुतकर, विठ्ठल वाघमारे, सुभाष भानवसे, सुभाष वसेकर, अविनाश मोकाशी, रईस पठाण, धनंजय भानवसे, मच्छिंद्र गाडे, लवहू वाघमोडे, केदार पाटील, ज्ञानेश्वर राऊत, तानाजी गोडसे, पांडुरंग वाघमारे, विष्णू म्हेत्रे, राजेंद्र भानवसे, वैभव वाघमारे, कुबेर कोळी, महेश राऊत, कल्याण क्षीरसागर, सुभाष पाटील, दत्ता राऊत, निवृत्ती राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



