कृषीदिनानिमित्त धर्मपुरी येथे कृषीदुतांकडून वृक्षारोपण संपन्न

धर्मपुरी (बारामती झटका)
धर्मपुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय यांच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुतांनी कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्राध्यापक एस. एम. एकतपुरे, प्राध्यापक एम. एम. चंदनकर, प्राध्यापक एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सुदर्शन सांगळे, सार्थक गवळी, अवधूत पाटणे, श्याम दवंडे, प्रदीप बाबर, ज्ञानराज भांगे, राहुल माने, युवराज भोसले, ऋतिक गायकवाड या कृषीदुतांनी केले.


या कार्यक्रमास गावच्या सरपंच सौ. निता झेंडे, उपसरपंच नितीन निगडे यांसह इतर सदस्य, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



