सुप्रसिद्ध व समाज प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार..
प्रगतशील बागायतदार स्वर्गीय शिवाजीराव सोपानराव वावरे उर्फ दादा यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध व समाज प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे गुरुवार दि. 16/11/2023 रोजी सायंकाळी 05 वाजता शहा धारशी प्लॉट, पुणे पंढरपूर रोड, माळशिरस येथे प्रगतशील बागायतदार स्वर्गीय शिवाजीराव सोपानराव वावरे उर्फ दादा यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन श्रीमती शामल शिवाजीराव वावरे, श्री. सचिन शिवाजीराव वावरे, श्री. महेश शिवाजीराव वावरे व वावरे परिवार यांनी केलेले आहे. तरी मित्रपरिवार, नातेवाईक व समस्त ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
माळशिरस शहरातील सोज्वळ व सौजन्यशील व्यक्तिमत्व असणारे शिवाजीराव वावरे उर्फ दादा यांचा आठ वर्षापूर्वी अपघात होऊन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होऊन उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला होता.
दादांचा स्वभाव सुसंस्कृत व मनमिळावू होता. सकाळ संध्याकाळी माळशिरस येथील किनारा हॉटेल या ठिकाणी त्यांचा बसण्याचा ठेपा होता. या ठिकाणी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव देशमुख सर्जेराव जानकर, कुंडलिक सरगर, दादासाहेब घुले, बाळासाहेब पानसरे दादा, सुरेश पवार तानाजी वाघमोडे यांच्यासह अनेक जीवाभावाचे मित्र होते. दादांच्या अचानक दुःखद निधनाने वावरे परिवारांसह मित्रपरिवार सुद्धा शोकाकुल झालेले होते. ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही, या उक्तीप्रमाणे सचिनआप्पा व महेश यांच्यावर कमी वयात कुटुंबाची जबाबदारी आलेली होती. मातोश्री श्रीमती शामल यांच्या मार्गदर्शनाखाली व दादांच्या आशीर्वादाने उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करून समाजामध्ये समाजकार्यातून वेगळा आदर्श निर्माण केलेला होता. गावामध्ये दादांच्या वागण्याचा व कार्याचा आदर्श घेऊन माळशिरस नगरपंचायत अटीतटीच्या निवडणुकीत सौ. ताई सचिन वावरे यांना प्रभागातील व माळशिरस नगरपंचायत हद्दीतील सर्व मतदारांनी बिनविरोध होण्याचा बहुमान दिलेला होता.
सचिनआप्पा यांनी उद्योग व्यवसायामध्ये भरभराटी केलेली आहे. काळाच्या ओघात दादांचे स्मरण करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. नवव्या पुण्यस्मरणला सुप्रसिद्ध व समाज प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन ठेवून समाज जागृती करण्याचे काम केलेले आहे. स्वर्गीयदादांचे आचार विचार व संस्कार यांची शिदोरी घेऊन वावरे परिवार यांची वाटचाल सुरू असल्याने वावरे दादा यांची आठवण मित्रपरिवार व नातेवाईक ग्रामस्थ यांच्या मनामध्ये दरवर्षी येत आहे.
बारामती झटका साप्ताहिक सुरू असताना दादा वाचक होते. दर गुरुवारी बारामती झटका अंक वाचण्याकरिता घरी घेऊन जात होते, असे आमचे वाचक स्वर्गीय शिवाजीराव वावरे उर्फ दादा यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
This was such an interesting read! I chuckled a few times. For more laughs and insights, visit: DISCOVER HERE. Anyone else have thoughts on this?