सुप्रसिद्ध साहित्यिका श्लेषाताई कारंडे भारतरत्न डॉक्टर बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय भारत भूषण आदर्श पुरस्काराने सन्मानित

सांगोला (बारामती झटका)
आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नॅशनल अवॉर्ड नवी दिल्ली येथे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन श्लेषा कारंडे यांना संविधान दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोग अध्यक्ष एम. एन. वेंकटरमन त्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तेच अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोग माजी अध्यक्ष सुरेखा लामतुरे यांच्या हस्ते सन्मानीत गौरव करण्यात आला.

त्यांच्या अनेक साहित्य, मराठी साहित्य संमेलन, साहित्यिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, विद्यार्थ्यांसंदर्भात विविध समाज उपयोगी उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, वाचन आवड क्षेत्रात विद्यार्थ्यासंदर्भात समाजात निर्माण केलेली जागृती, कमी कालावधीत अफाट साहित्य निर्मिती, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात उपस्थित राहून अध्यक्ष पद, प्रमुख पाहुणे पद भूषवले. त्यांचे शिक्षक संघटनेतील योगदान, अनेक सामाजिक प्रश्नांसंदर्भात समाजात जागृती निर्माण करणे, या संदर्भात त्यांनी केलेले बहुमोल योगदान यामुळे त्यांचा नवी दिल्ली येथे संविधान दिनानिमित्त झालेल्या संविधान भवन कार्यक्रमात बहुमान करण्यात आला. तसेच नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री खासदार ना. नितीन गडकरी याचीही भेट घेऊन सांगोल्यातील राजकीय परिस्थितीवर विविध मागण्याचे निवेदन दिले. यावेळी पुणे शिक्षक मतदार संघातील माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे हे देखील उपस्थित होते.


विद्या मंदिर हायस्कूल गार्डी, मा. मुख्याध्यापक उत्तम कारंडे सर, सर्व शिक्षक वर्ग, तसेच गार्डी ग्रामस्थ सरपंच श्री. शिवकुमार फाटे, पंचायत समिती सदस्य सत्यवान देवकुळे तसेच महूद येथील सरपंच मा. लुबाळ मॅडम, माजी डेप्युटी सरपंच दिलीप नागणे, माजी सरपंच श्री. बाळासाहेब ढाळे, समस्त महूद ग्रामस्थ, तसेच श्रीमती काशीबाई नवले बीएड कॉलेज कमलापूर, सांगोला येथील प्राचार्य माननीय पाटील सर, प्राध्यापक डॉ. शिवाजी जगताप सर, डॉ. नदाफ सर, प्राध्यापक डॉ. माळी सर, डॉ. पाटील मॅडम, प्राध्यापक गाडेकर सर, प्राध्यापक महारनोर सर, डॉ. कांगडे मॅडम, सिंहगड इन्स्टिट्यूट डायरेक्टर श्री. नवले सर आदींसह अनेक मित्रमंडळी यांनी त्यांचे अभिनंदन, शुभेच्छा व कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड सर, सोमनाथ राठोड सर, विनायक कुलकर्णी सर, बाळासाहेब शिंगाडे सर, लातूरचे नेते मधुकर कुलकर्णी सर, पाटील सर यांनी फोनवरून अभिनंदन केले. मंगळवेढ्याचे नामवंत साहित्यिक लक्ष्मण हेंबाडे, सांगोल्याचे साहित्यिक कृष्णा इंगोले सर तसेच अनेक महाराष्ट्रातील साहित्यिकांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन केले. हर्षदा गुळमीरे, सुवर्णा तेली, विना होरा, वंदना पाटणे, संगीता जाधव, सरपंच महादेव माने यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सांगोला परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.